कंधार ; प्रतिनिधी
रक्षाबंधन सण म्हणजे बहिण-भावांच्या स्नेहभावनेला जागृत करणारा भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवातील महत्त्वाचा सण आहे.यातच भारतीय वीर सैनिक बंधु आपल्या परिवारा पासून कोसोदूर राहून आपल्या भारत मातेची सेवा डोळ्यात तेल घालून दिवस-रात्र करत असतात.
गेल्या दहा वर्षां पासुन मन्याड खोर्यातील स्फूर्तिदायक रक्षाबंधनाच्या उपक्रमातून सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार दरवर्षीच ३३३३ सदिच्छापत्र व ३३३३ राख्या सोबत १५ फुटाची महाराखी पाठविचा उपक्रम डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या प्रेरणेतून अखंडित सुरु आहे.त्यांच्या पश्चात त्याचे सुपुत्र प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांच्या हस्ते महाराखीचे विमोचन डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या क्रांतिज्योती ज्ञानसागर शक्तीपिठाच्या साक्षीने करण्यात आले होते.
आज दि.१७ ऑगस्ट रोजी कंधार पोलिस स्टेशन येथे शासकीय गुत्तेदार वैजनाथराव सादलापूरे यांच्या अध्यक्षतेखालील वंदेमातरम या राष्ट्रीय गीताने सुरुवात झाली.
प्रमुख मार्गदर्शक कंधार ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड,कारगील युध्दात कामगीरी बजावणारे कॅप्टन प्रकाश कस्तूरे, कॅप्टन कपाळे यांची प्रमुख उपस्थितीत होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डाॅ. गंगाधर तोगरे यांनी केले तर पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी राष्ट्राभिमानी उपक्रमाचे कौतुक केले व अशा उपक्रमाचा अनेकांनी अनुकरण करावे असे गौरवोद्वार काढले.प्रजापिता ज्योती बहेनजी यांनी मान्यवरांचा सुविचार फ्रेम देवून सत्कार करत प्रस्तूत उपक्रमास सदिच्छा दिल्या.कार्यक्रमात कॅप्टन प्रकाश कस्तूरे यांनी मन्याड-गोदावरी खोऱ्यातील रक्षाबंधनाच्या स्फूर्तिदायक उपक्रमाचे कौतूक केले.
तर अध्यक्षीय समारोप शासकीय गुत्तेदार वैजनाथराव सादलापूरे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी ए.पी.आय.मुखेडकर, माजी सैनिक संघटनेचे अर्जुन कांबळे,माजी सैनिक पंदीलवार,कंधार शहरातील युवा नेतृत्व अँड गंगाप्रसाद यन्नावार,मुख्याध्यापक हरिभाऊ चिवडे,मुख्याध्यापक संजय वागलगावे,मुख्याध्यापक राजहंस शहापूरे,सेवानिवृत्त लिपीक नारायणराव पटणे,अँड सागर डोंग्रजकर,संपादक व पत्रकार माधवराव भालेराव, पत्रकार सिकंदर भाई, राजेश्वर कांबळे,विश्वंभर बसवंते,मुनीर शेख,माजी सैनिक नवघरे,सेवानिवृत्त पी.एस.आय शंकरराव ढगे,सतिश भाई,डीकळे मॅडम,नागीण मॅडम,सहीत अनेक पोलीस स्टेशन कंधार येथील पोलिस बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे यांनी केले.