कंधार, (प्रतिनिधी ) पत्रकार संरक्षक कायदयाची कठोर अमलबजावणी व्हावी, पत्रकारा वरील हल्ल्याचे खटले जलद गती न्यायालयात चालवावेत या मागणी साठी कंधार तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण कायदयाची होळी करून तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्याट आले.
महाराष्ट्रात 8 नोव्हेंबर 2019 पासुन पत्रकार संरक्षक कायदा लागू झाला. हा कायदा लागून करणारे देशात महाराष्ट्र पहिले राज्य आहे. हा कायदा सक्षम आहे मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो आता कुच कामी ठरला आहे. राज्यात गत चार वर्षात पत्रकारवर हल्ले किंवा धमक्या दिल्याचे 200 हुन अधिक प्रकरणे आहेत मात्र यातील केवळ 37 प्रकरणातच पत्रकार संरक्षक कायदा लागू केल्याने आणि त्यातील एकही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्याने या कायदयाची भीतीच समाज कंटकांच्या मनात उरली नाही. त्यामुळे पुन्हा पत्रकारावर हल्ले होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढते हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची अमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे.
तसेच कांही दिवसा पूर्वीच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ करणाऱ्या आमदार किशोर पाटील यांच्या वर व महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्याप्रमाने गुन्हा दाखल करावा या मागणी साठी तसेच संरक्षण कायादयाची अमलाबजावणी करण्यात यावी यासाठी कंधार तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने कंधार तहसील कार्यालया समोर गुरुवार दि.17 ऑगस्ट रोजी पत्रकार संरक्षक कायादयाची होळी करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंह ठाकूर, सचिव हाफिज घडीवाला, कार्याध्यक्ष एन.डी.जाभाडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य गंगाप्रसाद यन्नावार, सुभाष वाघमारे, दयानंद कदम, विश्वभर बसवंते, जमीर बेग, माधव भालेराव, दिगंबर वाघमारे, मुरलीधर थोटे, सय्यद हबीब,महंमद सिकंदर, संभाजी कांबळे, शेख शादुल, गोविंद शिंदे, एस.के.गायकवाड, एस.पी.जाधव यांची उपस्थिती होती.