श्रेयस गणेशराव गिरे चे आय एस एस ओ आंतरराष्ट्रीय परीक्षेतील निवडबद्दल सत्कार

कंधार ;  श्रेयस गणेशराव गिरे राहणार गऊळ ता. कंधार जि. नांदेड यांनी आय एस एस ओ या आंतरराष्ट्रीय परीक्षेत आंतरराष्ट्रीय स्तरावर 30 व्या क्रमांकाने व राष्ट्रीय स्तरावर 27व्या क्रमांकाने नेत्र दीपक यश मिळून महाराष्ट्राच्या नावलौकिकात भरीव यश प्राप्त केल्याबद्दल त्याचा दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी  तहसील कार्यालय कंधार येथे सत्कार करण्यात आला .

 

 

 

यावेळी कंधार लोहा  आमदार श्यामसुंदर शिंदे , डॉ.शरदराव मंडलिक  उप विभागीय अधिकारी , मारोतराव थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार , राम बोरगावकर  तहसीलदार कंधार यांच्या शुभहस्ते येतोचीतरीत्या सत्कार करून पुढील भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी श्री मारकड साहेब
पोलीस निरीक्षक कंधार , मा.बालाजी पांडागळे मा. सभापती पंचायत समिती कंधार, मा.श्री शाहू राजे पाटील नळगे मा. नगरसेवक कंधार ,मा. श्री स्वप्णिल पाटील लुंगारे मा. नगर अध्यक्ष प्रतिनिधी ,

 

श्री उत्तम चव्हाण मा. पंचायत समिती सदस्य कंधार ,श्री गणेश कुंठेवार मा.नगरसेवक कंधार सेवानिवृत्त प्रा. गंगाधर तोगरे सर मा. श्री माधवराव पाटील भालेराव मा.तालुका समादेशक अधिकारी होमगार्ड पथक कंधार लोहा मा.श्री बालाजीराव डफडे साहेब, माजी तालुका समादेशक अधिकारी तसेच कंधार येथील शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी तसेच कंधार येथील शाळेतील सर्व मुख्याध्यापक , शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी विद्यार्थिनी व बहुसंख्येने पत्रकार बंधू यांची उपस्थिती होती श्रेयसच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *