कंधार ; प्रतिनिधी
नांदेड जिल्हयात सर्वात मोठी कंधारची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे परंतु सध्या ती डबघाईला आली आहे . राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे . बाजार समितीला चांगले दिवस लेण्यासाठी भाजपाचा झेंडा फडकणार असून सभापती पण होणार आहे असे आश्वासन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे कार्यकत्यांना बोरी खु. येथे दिले .
बोरी खु. येथे तालुका कंधार येथे अधिक मासानिमित्त धोंडे जेवणाचा कार्यक्रम भाजपा विधानसभा प्रमुख प्रविण पाटील चिखलीकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब व भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव तथा नांदेड लोकसभा समन्वयक देविदासभाऊ राठोड, माजी आमदार सुभाषराव साबणे, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर,भारतीय जनता पार्टी माजी महानगर अध्यक्ष प्रवीणभाऊ साले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य भाऊ देशमुख, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस बालाजीराव बच्चेवार, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ चित्रलेखा गोरे , मुखेड सभापती खुशाल पाटील उमरदरीकर , लक्ष्मणराव ठकुरवाड, भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव डॉ. माधवराव उचेकर, सचिन पाटील चिखलीकर, अजय बिसेन, माणिकराव मुकदम , भाजपा तालुकाध्यक्ष भगवानराव राठोड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव केंद्रे, हिंगोली लोकसभा निवडणूक प्रभारी रामदास पाटील सोमठानकर,सरचिटणीस किसनराव डफडे, शहर सरचिटणीस मधुकरराव डांगे, भाजपा युवा आघाडी तालुकाध्यक्ष साईनाथराव कपाळे, शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, भाजपा शहराध्यक्ष ॲड गंगाप्रसाद यन्नावार,शाहुराज गोरे,प्रकाश गोरे, विनोद तोरणे, दत्ता डांगे,राजीव पाटील, गीते ताई,बालाजीराव झुंबाड सह कंधार तालुक्यातील विविध ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच सदस्य व सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन सदस्य हमाल मापाडी व्यापारी मंडळी सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती मतदार भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते आदीजण उपस्थित होते.