महा अंनिस अहमदपूर च्या वतीने रविवारी निर्भय मॉर्निंग वॉक चे आयोजन…!!

अहमदपूर ;( प्रा.भगवान आमलापुरे )

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा अहमदपूर च्या वतीने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी दि:- 20/08/2023 वार रविवार रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शहिद दिनी रविवारी सकाळी 6:00 वाजता, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गाने आझाद चौक -पोस्ट ऑफिस – डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा -सावरकर चौक ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर समारोप होईल .( निर्भय मॉर्निंग वॉक ) व निषेध नोंदविणार आहोत.
शहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांच्या निषेधार्थ मॉर्निग वॉक चे आयोजन केले आहे. शहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनास तब्बल 10 वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोळकर यांचे मारेकरी व यामागचे मास्टरमाइंड त्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही. याचा तीव्र संताप शांततामय मार्गाने व्यक्त करण्यासाठी महा अंनिस अहमदपूरचे कार्यकर्ते व पुरोगामी समविचारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत असे आवाहन महा अंनिस च्या वतीने करण्यात येत आहे.

आपले विनित

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा अहमदपूर जि.लातूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *