मन्याड खोर्‍यातील महाराखीचे प्रा.डाॅ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी केले विमोचन

 

कंधार/प्रतिनिधी

दिवंगत डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्याहस्ते विमोचन करून दरवर्षी मन्याड खोर्‍यातून १५ फुटाची महाराखी सीमेवर पाठविण्याची परंपरा होती. परंतू त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे सुपुत्र श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांच्या समर्थ हस्ते दि.१५ ऑगस्ट रोजी बहाद्दरपुऱ्यातून भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या दिनाचे औचित्य साधून हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराखीचे विमोचन करण्यात आले.
रक्षाबंधन सण म्हणजे बहिण-भावांच्या स्नेहभावनेला जागृत करणारा भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवातील महत्त्वाचा सण आहे.भारतीय वीर सैनिक बंधु आपल्या परिवारा पासून कोसोदूर राहून भारत मातेची सेवा करतात.गेल्या दहा वर्षां पासुन मन्याड खोर्‍यातील रक्षाबंधनाच्या उपक्रमातून सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार दरवर्षीच ३३३३ सदिच्छापत्र व ३३३३ राख्या सोबत १५ फुटाची महाराखी पाठविचा उपक्रम डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या प्रेरणेतून अखंडित राबवित आहे.
सन १९९९ मध्ये भारतीय सैनिकांनी पाकड्या रेंजर्सना चारी मुंड्या चीत केल्यानंतर ऑगस्ट महिन्यात संत नामदेव महाराज मठ संस्थान उमरज व श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने कंधार शहरात मिरवणूक काढून भारतीय सैनिकांना चांदीची बोफोर्स तोफ कंधार मामलेदार कचेरीच्या मध्यस्तीने भारतीय सीमेकडे रवाना करुन मन्याड खोरी अनोखी परंपरा दाखवून दिली होती. हैद्राबाद मुक्ती संग्राम लढा, ७ ऑगस्टचा विद्यार्थी दशेतला छ. संभाजी नगरचा गोर्‍यांच्या विरोधतला सत्याग्रहाच्या वेळी खाली पडले, लाठ्या-काठ्या झेलल्या पण हातात असलेला तिरंगा राष्ट्रध्वज फडकत ठेवला.
दिवंगत डॉ. भाई केशवराव धोंडगे यांनी यातून आपली स्वाभिमानी देशभक्ती इंग्रजांना दाखवून दिली होती.दरवर्षीच १३ व १४ सप्टेंबर रोजी हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यातील धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांच्या व रझाकारांचा मुकाबला करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या तीर्थक्षेत्रांच्या दर्शनसाठी रणयात्रा काढून त्यांनी इतिहास घडविला. हौतात्म्यांचे नातेवाईक,स्वातंत्र्य सैनिकाचा सत्कार श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारच्या संस्थेतील विविध शाखांमधून १७ सप्टेंबर रोजी दरवर्षी करुन त्यांच्या मर्दुमकीला शाबाशी दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *