कलदगाव [ता अर्धापुर]
जि नांदेड या माझ्या गावात जेव्हढी माणसं तेव्हढीच वडा पिंपळाची वृक्ष लागवड या मोहिमेला आज सुरुवात केली. प्रथम टप्प्यात 100 वृक्ष लागवड करतोय. जून पर्यंत वड आणि पिंपळाची पाचशे वृक्ष गावात डौलताना तुम्हाला पहायला भेटतील.
बाकी सरकारी यौजनेतून सरकारी झाडांची लागवड झालेली आहेच. पण हे वडा पिंपळाच्या वृक्षांची लागवड गावकऱ्यांच्या वतीने. यासाठी आमच्या गावचे सरपंच श्याम तिम्मेवार यांनी मोलाची मदत केली. ही चळवळ संपूर्ण मराठवाडाभर राबविण्यासाठी मी स्वतः प्रत्येक गावात जाईन. आणि तेथील लोकांच्याच सहकार्याने ही वड पिंपळाची वृक्ष लागवड चळवळ उभी करेन असा माझा पुढील पाच वर्षांसाठी चा मी स्वतःच ठरवलेला कार्यक्रम आहे.
तरी सर्व मराठवाड्यातील माझ्या मित्र सहकारी मंडळींना याकामी मदतीचे आवाहन करतो की आम्हाला वड आणि पिंपळाचे रोपं बिनामोबदला उपलब्ध करून द्यावीत. त्या बदल्यात मी त्या झाडांची लागवड व संरक्षण करण्याची जिम्मेदारी घेतो..
.संतोष गव्हाणे , 8208412037