कंधार ; प्रतिनिधी
माजी सभापती भाऊसाहेब पाटील कदम यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली असून हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून, त्यासाठी मी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब , मा. मंत्री डी .पी सांवत साहेब आणि जिल्हा अध्यक्ष गोविदराव शिंदे नागेलीकर यांचा मनःपूर्वक आभार मानत प्रतिक्रिया दिली .
काँग्रेस पक्षामध्ये संघटनात्मक जबाबदारी मला मिळाली आहे आणि ती जबाबदारी मी प्रामाणिकतेने व परिश्रमपूर्वक पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. काँग्रेस पक्षाचा नांदेड जिल्हा उपध्याक्ष म्हणून देखील मी मा. मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यांचा विश्वास सार्थ ठरविण्यास वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले .