अंनिसचा ‘अविवेकी’ चेहरा झाकण्यासाठी अविनाश पाटील यांचे सनातनवर बेछूट आरोप ! – सनातन संस्था

 

सनातनवर खोटे आरोप करून स्वतःची पापं झाकण्याचा प्रयत्न अविनाश पाटील करत आहेत. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’मधील आर्थिक घोटाळ्यांमुळे अंनिसची दोन शकले झाली असून संघटनेत अनागोंदी उसळली आहे. संघटना आणि ट्रस्ट यांवर ताबा मिळवण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी अविनाश पाटील आटापिटा करत आहेत. या सर्व गोष्टींपासून राज्याचे आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी अविनाश पाटील सनातनवर बेछूट आरोप करत आहेत. सनातनवर आरोप करण्यापूर्वी ‘विवेकवाद’, ‘नैतिकता’, ‘तत्त्वनिष्ठता’, ‘पुरोगामित्व’ यांची जर अविनाश पाटील यांना चाड असेल, तर त्यांनी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या त्रिदशकपूर्तीनिमित्त जमा केलेल्या 52 लाख रुपयांपैकी 28 लाख रुपये बेकायदेशीररित्या ‘विवेक जागर’ नावाचा नवीन ट्रस्ट स्थापन करून त्यात वळवण्याचा आर्थिक घोटाळा का केला, याचे उत्तर जनतेला द्यावे. अविनाश पाटील यांनी अंनिसचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. एन्.डी. पाटील यांची खोटी सही करून अंनिसचे बँकेतील अकाऊंट फ्रिज का केले? असे त्यांना का करावे लागले ? खोट्या सह्या करणे हे कोणत्या ‘विवेका’त बसते ? अशा प्रकारे अनेक ब्लंडर्स केल्याचे सनातन नव्हे, अंनिसचेच माधव बावगे यांनी एका प्रतिष्ठित वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट झाले आहे. अंनिसचेच विश्वस्त दीपक गिरमे यांनी अविनाश पाटील यांना अनेक प्रकारच्या आर्थिक अनियमितता केल्यामुळे कायदेशीर नोटीस बजावली आहे. अशा अविनाश पाटीलसारख्या घोटाळेबाजाने सनातनवर खोटे आरोप करणे, हा स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रकार आहे, *असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी म्हटले आहे.*

कोणालाही अटक करायची असेल, तर त्याविषयी न्यायालयात अथवा तपासयंत्रणांकडे विश्वसनीय पुरावे असावे लागतात, याचे भान स्वत:ला विवेकतावादी अन् विज्ञाननिष्ठ म्हणवणार्‍या अंनिसवाल्यांना राहिलेले नाही. त्यामुळेच डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त एका कार्यक्रमात बोलतांना अविनाश पाटील यांनी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून कोणत्या विचारसरणीच्या लोकांनी केला, हे सर्वांना माहित आहे. तरीही सनातन संस्थेचे अध्यक्ष जयंत आठवले यांना अटक का केली जात नाही?’ असे वक्तव्य केले. तसेच ‘दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चार हत्या सनातन संस्थेने केल्या’, असा आरोपही अविनाश पाटील यांनी केला. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात अंतीम टप्प्यात असतांना, अद्याप कोणतेही आरोप सिद्ध झालेले नसतांना, निकाल येण्यापूर्वी अशी विधाने करून अंनिसवाले न्यायाधीशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण न्यायालय खोट्या आरोपांवर नव्हे, तर पुराव्यांच्या आधारे कारवाई करते. सनातन संस्थेची न्यायदेवतेवर आणि ‘सत्याचाच विजय होतो’ या धर्मवचनावर श्रद्धा आहे, *असेही श्री. राजहंस यांनी म्हटले आहे.*

आपला नम्र,
*श्री. चेतन राजहंस,*
राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.
संपर्क : 77758 58387

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *