कंधार तालुका कॉंग्रेस कमिटी सचिव पदी सुरेश सोनकांबळे कल्लाळीकर यांची निवड

कंधार ; प्रतिनिधी

आजपर्यंतच्या पक्ष संघटनेतील केलेल्या कामाची दखल घेऊन, आ. अशोकरावजी चव्हाण (मा. मुख्यमंत्री) यांच्या शिफारशीने आ. नाना पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, मुंबई यांनी सुरेश तुकाराम सोनकांबळे कल्लाळीकर यांची कंधार तालुका कॉंग्रेस कमिटीच्या सचिव पदी नियुक्ती केली . कंधार तालुका अध्यक्ष बालाजी पांडागळे यांनी नियुकीचे पत्र त्यांना दिले .

आज दि.२३ ऑगस्ट रोजी काग्रेस कमेटी जिल्हा सचिव संजय भोसीकर अमित मोरे यांच्या सह कंधार शहरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला . कंधार तालुका कॉग्रेस कमिटीचे सचिव म्हणून अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काम करावे आणि कॉग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार समाजातील सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेवून व पक्ष शिस्त पालन करून तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *