मातोश्री भागाबाई डोंगरे पुरस्कारासाठी निवड समिती जाहीर

नांदेड – मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान उमरीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी प्रतिष्ठानची एक महत्वपूर्ण बैठक होऊन येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांची पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ कवी पांडुरंग कोकुलवार यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव नागोराव डोंगरे यांनी दिली. यावेळी  प्रतिष्ठानचे अध्यक्ष  प्राचार्य ए. एस. जाधव, साहित्यिक अनुरत्न वाघमारे, कैलास धुतराज, रणजित गोणारकर, मारोती कदम यांची उपस्थिती होती.
                      प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्रायकीय, राजकीय, पत्रकारिता, साहित्य आदी क्षेत्रांतील महिला व पुरुष यांना पुरस्कार दिले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ते अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जात आहेत. आजपर्यंत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक महिला आणि पुरुष महनीय व्यक्तींना मातोश्री भागाबाई डोंगरे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. सन २०२३ या वर्षाकरिता एकूण पाच पुरस्कारांसाठी निवड करण्यात येणार आहे असे शहरातील लेबर कॉलनी परिसरात प्राचार्य ए.एस. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरले. पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, शाल, पदक, मानचिन्ह, मानपत्र, गौरवचिन्ह, ग्रंथ असे आहे.

                        सन २०२३- २४ या वर्षाकरिता इच्छुकांनी आपल्या नाव, फोटो, पत्यासह आवश्यक माहितीचा बायोडाटा असलेला प्रस्ताव नागोराव डोंगरे, आशिर्वाद निवास, यशवंत काॅलनी, उमरी ता. उमरी जि. नांदेड -४३१८०७ या पत्यावर ३० सप्टेंबर २०२३ अखेर पर्यंत पाठवावेत. साहित्यिकांनी आपली २०२२-२३ या वर्षातील प्रकाशित साहित्यकृती दोन प्रतींत पाठविणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींनी आपल्या योग्य माहितीसह प्रस्ताव विहित कालावधीत सादर करावेत असे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव ग्रामीण कवी नागोराव डोंगरे आणि राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *