कंधार ; प्रतिनिधी
चंद्रयान -3 थ्री चे दिनांक 23 ऑगस्ट रोजी यशस्वी चंद्रावर लँडिंग झाले त्याबद्दल कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी आनंद उत्सव साजरा करण्यात आला . चिमुकल्यांना खाऊचे वाटप करण्यात आले भारत माता की जय चा गजर करत परिसर भक्तीमय झाला .
गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डी एन केंद्रे साहेब , सचिव चेतन भाऊ केंद्रे , संचालिका अनुसया गीते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार येथील महात्मा फुले शाळा विविध उपक्रम राबवते .
सदरील कार्यक्रमासाठी प्रियदर्शनी कन्या शाळेच्या माजी प्राचार्य सौ .राजश्री शिंदे तसेच प्राध्यापक शिंदे , महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी जी , शाळेच्या शिक्षिका सौ यु.एम कागणे , आनंदा आगलावे , आर एस केंद्रे , बालकताई चंद्रकला तेलंग , माणिक बोरकर , यांची उपस्थिती होती .