नांदेड, दि. २४ ऑगस्ट २०२३:
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी चंद्रयान-३ मोहिमेत सहभागी असलेल्या तनुजा पत्की यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या त्यांचे कौतूक केले. त्यांचे वडील कै.डॉ. कालिदास देशपांडे नांदेडच्या सायन्स कॉलेजचे प्राचार्य होते.
तनुजा पत्की बंगळुरू येथे इस्रोसाठी कार्यरत आहेत. चव्हाण यांनी आज पत्की यांचे बंधू डॉ. राजस देशपांडे यांना दूरध्वनी केला व त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. नांदेडशी जुना बंध असलेली एक कन्या भारताच्या ऐतिहासिक चंद्रयान-३ मोहिमेत योगदान देते, ही बाब सर्व नांदेडकरांना अभिमानाची अनुभूती देणारी असल्याचे चव्हाण यांनी डॉ. देशपांडे यांना सांगितले.