नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिनांक 27 ऑगस्ट रोजी हिंगोली येथील रामलीला मैदानावर दुपारी 2 वा.जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या सभेनिमित्त नांदेड विमानतळावर त्यांचे आगमन होणार असल्याने उद्धवजी ठाकरे यांच्या स्वागतासाठी नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी दुपारी 12 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख माधव पावडे, जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर , जिल्हाप्रमुख बबन बारसे , जिल्हाप्रमुख बंडू खेडकर यांनी केले आहे.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा महाराष्ट्रातील शेवटच्या घटकापर्यंत पुन्हा एकदा पोहोचून महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शिवशाही निर्माण करण्यासाठी, जाज्वले हिंदुत्व शेवटच्या घटकापर्यंत पोहचून शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्याचे अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची महाराष्ट्रावर पक्ष पूनरबांधणी सुरू आहे . मराठवाड्यात शिवसेनेला बळकटी मिळवून देत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लोकसभा आणि विधानसभांमध्ये मोठी यश मिळविण्याच्या अनुषंगाने झंजावाती दौरे सुरू झाले आहेत. हिंगोली येथील रामलीला मैदानावर रविवार दिनांक 27 जुलै रोजी दुपारी दोन वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या जाहीर सभेच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांचे नांदेड विमानतळावर दुपारी 12 वा. आगमन होणार आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने नांदेड विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी ,लोकप्रतिनिधी, युवा सेना, महिला आघाडी,आजी माजी सर्व पदाधिकाऱ्यांनी , कार्यकर्त्यांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडे, जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर , जिल्हाप्रमुख बबन बारसे, जिल्हाप्रमुख बंडू खेडकर यांनी केले आहे.
चौकट
हिंगोलीच्या जाहीर सभेसाठी नांदेडमधून हजारो शिवसैनिक जाणार : जिल्हाप्रमुख माधव पावडे यांची माहिती
महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचे भगवे वादळ निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकविण्यासाठी आणि गद्दारांना त्यांची जागा दाखवून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवार दिनांक 27 जुलै रोजी दुपारी हिंगोली येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे . रामलीला मैदानावर पार पडणाऱ्या या जाहीर सभेस नांदेड जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक उपस्थित राहतील अशी माहिती जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी दिली आहे.