कंधार दि.5 सप्टेंबर
देशातील सुसंस्कृत व आदर्श पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करतात असे प्रतिपादन सामाजीक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांनी 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त प्रियदर्शनी मुलींचे उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
कंधार येथील प्रियदर्शनी कन्या शाळेत शिक्षक दिनानिमित्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजित करण्यात आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर,प्राचार्या सौ. राजश्री शिंदे, विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार संजय भोसीकर व सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सौ. वर्षाताई भोसीकर म्हणाले की शाळा आहे आदर्श समाज निर्मितीचे केंद्र असून या केंद्रामध्ये शिक्षक बालकावर संस्कार करून त्यांना सुसंस्कृत घडवतात व विद्यार्थ्यामध्ये देशाचे आदर्श नागरिक बनण्याचे संस्कार रुजवतात म्हणूनच या शिक्षक दिनी मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना शुभेच्छा देते व त्यांच्याकडून अशाच प्रकारे आदर्श समाज निर्मितीचे कार्य अखंड चालू राहो अशी अपेक्षा व्यक्त करते.
याप्रसंगी संजय भोसीकर यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या व आज सबंध देशामध्ये लोकडॉउन मुळे शाळा जरी बंद असल्या तरी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण चालू आहे शाळा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिक्षण देऊन कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी संजय भोसीकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सौ राजश्री शिंदे यांनी केले तर सूत्र संचलन व आभार प्रदर्शन प्राध्यापक चंद्रकांत सोनटक्के यांनी केले.