कंधार :- ( प्रतिनिधी हानमंत मुसळे )
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कंधार तालुका सचिवपदी सुरेश तुकाराम सोनकांबळे (कल्हाळीकर) यांची आज पर्यतच्या पक्ष संघटनेतील केलेल्या कामाची दखल घेऊन मा. आ. अशोकराव चव्हाण (माजी मुख्यमंत्री) यांच्या शिफारशीने मा. आ. नाना पटोले (प्रदेशाध्यक्ष काँग्रेस) यांनी नियुक्ती केली असुन नियुक्तीचे पञ मा. डि. पी. सावंत (माजी मंत्री), भास्कर पा. खतगावकर, आ. अमर राजुरकर, हाणमंतराव पा. बेटमोगरेकर, आदिच्या हस्ते देण्यात आले आहे.
सुरेश कल्हाळीकर है 36 हुतात्मे असलेल्या कल्हाळी गावचे 2 वेळा उपसरपंच व गेल्या 15 वर्षापासून पञकार असुन कंधार पञकार संघाचे सचिव पद भिषविले आहे. व शासकिय रुग्ण कल्याण समिती पेठवडज सदस्य असुन ते रुग्णाच्या अडचणीला धावुन जावुन त्याना दिवस राञ मदत करत असतात. कल्हाळीकर है माजी आ. बेटमोगरेकर यांचे विश्वासु व कट्टर समर्थक म्हणून जिल्हात नाव लौकिक आहेत. गेल्या 25 वर्षापासून ते राजकारणात सक्रिय असुन त्यांनी दीन-दलित, उपेक्षित, कष्टकरी, शेतमजुर, शेतकरी, विद्यार्थी, गरीब जनतेच्या अडचणीला धावुन जाऊन त्यांना सदैव मदत केली त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आदि क्षेत्रामध्ये त्याच्या सहभाग सदैव राहतो. समाज हिताचे नव-नवीन कार्यक्रम घेत असतात.त्याची नांदेड जिल्हयामध्ये एक वेगळी औळख असुन मा. आ. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असुन पक्षाच्या ध्येय धोरणानुसार समाजातील सर्व जातीच्या घटकांना सोबत घेवुन व पक्ष शिस्त पालन करुन तालुक्यात पक्ष संघटन मजबुत करणार असे त्यांनी सांगितले आहे.
आदि निवडी बदल रामराव पवार (माजी नगराध्यक्ष), मन्नान चौधरी, सुधाकर अण्णा कांबळे, हमीद सुलेमान, डाँ. दिपक बडवणे, बालाजी पांडागळे, शाहजी नळगे, संजय भोसीकर, अजय मोरे, सतिश नळगे, शिव कुरुळेकर, सतिश देवकत्ते, स्वप्रिल परोडवाड, देविदास कारभारी, गजानन गडमड, बाळू पवार, रुषिकेष बसवंते अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.