कंधार;( राजेश्वर कांबळे )
तालुक्यातील श्रीक्षेत्र उमरज येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव व श्री संत सदगुरू नामदेव महाराज यांच्या २५१ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गुरुवार,१२ आॅगस्ट ते गुरुवार,७ सप्टेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत नामदेव महाराज संस्थानचे मठाधिपती श्री संत महंत एकनाथ महाराज यांनी केले आहे.
तालुक्यातील श्रीक्षेत्र उमरज येथे गुरुवार,३१ ऑगस्ट पासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात होणार आहे. दररोज पहाटे ४ ते ६ दरम्यान काकडा भजन, सकाळी ७ ते ९ श्री संत नामदेव महाराज ग्रंथाचे पारायण, सकाळी १० ते दुपारी १२ गाथा भजन, दुपारी १ ते ४ दरम्यान श्रीराम कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० हरिकीर्तन व हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम पार पडणार आहेत.
गुरुवार,३१ ऑगस्ट रोजी ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री, शुक्रवार,१ सप्टेंबर रोजी ह.भ.प.उल्हास महाराज सुर्यवंशी, शनिवार,२ सप्टेंबर रोजी ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले. रविवार,३ सप्टेंबर रोजी ह.भ.प.प्रमोद महाराज जगताप, सोमवार,४ सप्टेंबर रोजी ह.भ.प.उमेश महाराज दशरथे, मंगळवार,५ सप्टेंबर रोजी ह.भ.प.आक्रुर महाराज साखरे, बुधवार,६ सप्टेंबर रोजी ह.भ.प.रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे, गुरुवार,७ सप्टेंबर रोजी ह.भ.प.श्री संत महंत एकनाथ महाराज उमरजकर आदींचे किर्तन होणार आहे.
यावेळी सकाळी आनंदवाडी, कदमाचीवाडी, पाताळगंगा, केकत शिंदगी, बोरी (खु), माळहिप्परगा, आडमाळवाडी, तर संध्याकाळी बाभुळगाव, दगडसांगवी, कारला, कल्हाळी, पानशेवडी, नांदुरा, उमरज आदी गावातील गायनाचार्य, मृदंगाचार्य व भजनी मंडळी उपस्थित राहणार आहे. हरिपाठाचे नेतृत्व श्रीक्षेत्र उमरज येथील श्री संत नामदेव महाराज वारकरी संस्था करणार आहे.
बुधवार,६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११ वाजता ॐ नमो नामदेवाय नम या महामंत्राचा सव्वा लाख नाम जप होणार आहे. रात्री १० ते १२ दरम्यान श्री गुरु नामदेव महाराज यांच्या समाधीचा महाअभिषेक व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे.
गुरुवार,७ सप्टेंबर रोजी या सप्ताहाची सांगता भगवान कैलासअप्पा बोधनकर यांच्या महाप्रसादाने होणार आहे. या सप्ताहाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत नामदेव महाराज संस्थानचे मठाधिपती श्री संत महंत एकनाथ महाराज यांनी केले आहे.
चौकट
पादुकांची होणार स्थापना
सोमवार,४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४० वाजता नवीन जीर्णोद्धारातील मंदिरामध्ये पादुकांची स्थापना, लघुरुद्र अभिषेक व पूर्ण आहुतीचा सोहळा पार पडणार आहे.