खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे तळ्याचीवाडी ता.कंधार येथील डोंगरतीचा मारोती मंदिर येथे भंडारा कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शन ; कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बाबत केले मतदार सभासदाना आवाहन

कंधार ; प्रतिनिधी

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तळ्याचीवाडी ता. कंधार येथे सर्व ग्रामस्थांच्या वतीने डोंगरतीचा मारोती मंदिर येथे आयोजित भंडाराच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहून हनुमानरायाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला व मार्गदर्शन केले .

 

यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर,शेकापुर सोसायटी चे चेअरमन तथा माजी सरपंच शिवाजी केंद्रे, यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी केले,

आभार सरपंच प्रतिनिधी केंद्रे यांनी केले यावेळी उपस्थित भाजपा जेष्ठ नेते बालाजी झुंबाड मामा, भाजपा सरचिटणीस किसनराव डफडे, भाजपा युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर, भाजपा शहर अध्यक्ष तथा नांदेड लोकसभा विस्तारक गंगाप्रसाद यन्नावार, शाहूराज गोरे, भाजपा शहर सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष प्रतीनीधी चेतन केंद्रे, भाजपा शहर सरचिटणीस मधुकर डांगे, भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, माजी नगरसेवक प्रतिनिधी शेख आसिफ, प्रभाकर केंद्रे, ग्रामपंचायत तळ्याची वाडी माजी सरपंच बाळासाहेब गर्जे, भाविक भक्त व फुलवळ व कुरूळा सर्कल मधील सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन सदस्य आणि सरपंच सदस्य व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *