कंधार; प्रतिनिधी
कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणूक सन 2023 -2028 या कालावधीच्या कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून शेकाप काँग्रेस युतीच्या शेतकरी विकास पॅनलने प्रचारात आघाडी घेतली असून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकरी, हमाल, मापाडी, व्यापारी यांचे हित जोपासत व त्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप- काँग्रेस युतीचे शेतकरी विकास पॅनल तत्पर असल्याचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी प्रचारादरम्यान स्पष्ट केले आहे,
काँग्रेस युतीच्या प्रचाराचा शुभारंभ लोहा कंधारचे आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते बहादरपुरा येथून करण्यात आला होता, यावेळी शेकाप व काँग्रेसच्या वतीने मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. गेल्या 26 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे, या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदारसंघ, सेवा सहकारी महिला राखीव मतदार संघ, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदारसंघ, सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती- भटक्या जमाती मतदारसंघ, ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल मतदारसंघ या मतदारसंघातील मतदारांचे बाजार समिती निवडणुकीत मतदान निर्णायक ठरणार आहे,
विकासाच्या अजेंड्यावर लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे, शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक शेतकऱ्यांच्या हितासाठी मतदार बंधू भगिनी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व 18 पैकी 18 उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी आमदार शिंदे व आशाताई यांच्या माध्यमातून कंधार तालुक्यातील बहादरपुरा, शिराढोण, पेठवडज, कौठा, करूळा व तालुक्यातील अनेक ठिकाणी शेकाप व काँग्रेस कार्यकर्ता, पदाधिकारी व संचालकांच्या बैठका घेतल्या होत्या,
या बैठकांना सर्व मतदार बंधू भगिनींनी प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे शेतकऱ्यांचा विकास साधणाऱ्या व शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या शेकाप व काँग्रेस युतीच्या शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतील असा विश्वास यावेळी लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे व शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी प्रचारादरम्यानच्या बैठकीत व्यक्त केला ,यावेळी आमदार शिंदे बोलताना म्हणाले की बाजार समिती आमच्या ताब्यात आल्याच्या नंतर शेतकरी, हमाल, मापाडी, व्यापारी यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना येणाऱ्या काळात राबवणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे यांच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या निधीतून शेतकऱ्यांना दळणवळणासाठी सुलभ सुविधा होण्यासाठी आमदार शामसुंदर शिंदे यांनी पाच कोटी रुपयाचे नवीन चकचकीत रस्ते केलेले आहेत.
बाजार समितीच्या प्रचाराच्या रणधुमाळी मध्ये जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर, कंधार पंचायत समितीचे माजी सभापती भाऊसाहेब कदम, कंधार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजीराव पांडागळे, लोहा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पवार,, माजी नगरसेवक शहाजी नळगे, रोहित पाटील शिंदे, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, माजी पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे, माजी नगराध्यक्ष मन्नान चौधरी, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, शेकाप जिल्हाध्यक्ष बालाजी ईसातकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख शेरू भाई, शेकाप कंधार तालुकाध्यक्ष अवधूत पेठकर, लोहा तालुकाध्यक्ष नागेश हिलाल, महेश पिनाटे सह शेकाप काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचारादरम्यान परिश्रम घेत असल्याचे दिसून येत आहे,
एकंदरीत शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस युतीच्या शेतकरी विकास पॅनलचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे.