सोनल मॅम , मी हस्तमैथुन ( masturbating) करतो ,,हे चांगलं की वाईट??..
हा माझ्या २२ वर्षीय वाचकाचा प्रश्न होता..
खरं तर याबद्दल अधिक जाणुन घ्यायला मी माझ्या डॉक्टर मित्राशी बोलत असताना सचिन मला म्हणाला ,,सोनल तु omg 2 मुव्ही पण बघ..
हस्तमैथुन ( masturbating) ही सहज प्रक्रिया आहे.. त्यात वाईट काहीच नाही.. पाप तर अजिबात नाही.. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेकही नको….
वयात येणाऱ्या मुलांना लैगिकतेचं ज्ञान देणं यासाठीच खुप गरजेचं आहे.. आणि हे काम घरी पालक आणि शाळेत शिक्षक यातुन झालं तर ते मुलांना उत्तम पध्दतीने समजू शकतं आणि त्यांच्या शंका कुशंका यांचं उत्तम पध्दतीने निराकरण होवु शकतं .. वयात येताना आई वडीलांनी मुलांचे मित्र होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी नवरा बायको यांनीही मित्र बनणं गरजेचे आहे.. नवरा बायको व्हीलन नसुन तेच पुढच्या सक्षम पिढीसाठी सक्षम नागरिक असायला हवेत… मुलांना शिक्षण दिलं , नावावर पैसे , प्रॉपर्टी ठेवली म्हणजे काम होत नाही तर मुलं मानसिक रुग्ण होवु नयेत म्हणुन आणि पुढे जाऊन ते त्यांच्या मुलांचे उत्तम पालक व्हावेत असे वाटत असेल तर आतापासुन मुलं आणि आपली पिढी यातील अंतर कमी करणं गरजेचं आहे.. आणि हे होवु शकतं फक्त संवादाने.. अजूनही वेळ गेलेली नाही.. घरात लैगिकतेवर चर्चा करा.. पुस्तके वाचा.. मुलांना वाचु द्या.. कारण मुलं एकमेकांशी बोलुन त्यांना अर्धवट ज्ञान देणार त्यापेक्षा मुलांच्या मित्रांना घरी बोलवुन त्यांना याविषयी पूर्ण ज्ञान द्या आणि त्यासाठी शास्त्रीय माहीती पालकांनी घेणं गरजेचं आहे..
( तळटीप.. मूव्ही जरूर पहा आणि मुलांसोबत पहा.सचिन आधीच पाहुन आला होता.. काल माझ्यासाठी तिकीट काढत असताना मी माझ्या गृपवर मेसेज केला.. मी मुव्हीला जातेय कोणी येणार आहे का ??.. एक मित्र म्हणाला ,मी येतो सोनल.. सचिन ने कोण मित्र आहे हे न विचारता दोन तिकीटे काढुन दिली.. मुव्ही पाहुन आल्यावर सुध्दा एकही प्रश्न मित्राबाबत विचारला गेला नाही.. हे आवर्जून नमुद करत आहे कारण नवरा बायकोचं नातं हे इतकं पारदर्शी हवं .. मी आज जे लैगिकतेवर लिहीते बोलते ते फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यामुळे.. नवरा बायको मधे विश्वास असेल , स्पेस असेल , खरेपणा असेल तर काय घडु शकतं याचं उत्तम उदाहरण तुमच्या समोर आहे.. )
सोनल गोडबोले.. लेखिका , अभिनेत्री