महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत शंभर फुटाचाच त्वरित रस्ता करा, अन्यथा बेमुदत उपोषण.
बालाजी चुक्कलवाड यांचा इशारा.
————————————————————————–
कंधार प्रतिनिधी
कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल हा मुख्य रस्त्याची दैनिय अवस्था झाली आहे.हा होणार असल्याच्या नुसत्या पोकळ चर्चा अनेक महिन्यांपासून ऐकायला मिळत आहेत.या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे परंतु काही मुठभर लोकांना वाचवण्यासाठी हा रस्ता शंभर फुटांवरून कमी करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे या रस्त्याचे काम चालु केल्या जात नाही. कंधार शहराच्या विकासासाठी राजकीय नेत्यांनी खोडा घातला असल्याने या लबाड पुढाऱ्यांवरचा जनतेचा विश्वासच उडुन गेला आहे.या रस्ताची दैनिय अवस्था झाली असल्याने नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे.या कामासाठी निधी मंजूर झाला असुन त्याचे वर्कआर्डर झाली असे असतानाही गेल्या चार पाच महिन्यांपासून काम मात्र चालु होतं नाही.मुठभर लोकांना खुश करण्यासाठी शहराचे वाटोळे करून नका,महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत शंभर फुटाचाच रस्ता करा, व२७ तारखेपर्यंत या रस्त्याच्या कामाचे काम चालू करा अन्यथा २८ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण.माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांचा निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.
कंधार शहर हे बसस्थानक ते गांधी चौक हे एकाच मुख्य रस्ताने जोडले गेले असुन याच रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे.सन 2009 पासुन या रस्त्याच्या नावाने राजकीय नेते पोळी भाजून घेत असल्याचे दिसून येते. 13 वर्षाखाली हायवे रस्त्याच्या नावाखाली बाजारपेठ उध्दवस्त करण्यात आली.मुळात हा रस्ता हायवे नव्हताच केवळ राजकीय नेत्यांच्या अहंकारामुळे रुंदीकरणाच्या नावाखाली मोठमोठ्या इमारती उध्दवस्त करण्यात आल्या. 13 वर्षात रस्ता झाला नाही याचे मोठे दुःख कंधारकरांना आहे.ज्या हायवे रस्त्याच्या नावाखाली बाजारपेठ पाडली ते रस्तेच शहराच्या बाहेरून गेल्याने शहराचे वैभवच गेले.येथिल राजकीय नेत्यांनी थोडे प्रयत्न केले असते तर हे रस्ते कदाचित शहरातुन गेले असते व शहराच्या विकासात भर पडली असती.येथील राजकीय पुढारी हे खेकडा प्रवृत्तीचे असल्याने विकास कमी परंतु एकमेकांवर खालच्या पातळीवर टिका करुन आपणच खरे विकासपुरुष असल्याचा गाजावाजा करणे हाच उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहे .
महाराणा प्रताप चौक ते स्मशान भूमी या रस्त्याची दैनिय अवस्था झाली असुन खड्डेमय रस्ता झाला आहे.नगर पालीकेच्या वतिने वारंवार खड्डे बुजवून मलमपट्टी करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केल्या जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खेड्यात पाणी साचुन गाडी घसरुन अपघात होत आहेत.या रस्त्याच्या दोन्हीही बाजूने अतिक्रमण झाले असल्याने शंभर फुटाचा रस्ता केवळ 20 फुटच शिल्लक राहिला आहे. या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजुर झाला असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाले आहेत. गुत्तेदारांनी अद्यापही कामात सुरुवात केली नाही. अंदाजपत्रकात हा रस्ता शंभर फुटाचाच आहे. रस्त्याच्या एका बाजूला नगर पालिकेची शाॅपीग सेंटर आहे.या शाॅपीग सेंटर मध्ये लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यांचे दुकान आहेत.त्यामुळे हे दुकान वाचवण्यासाठी चक्क रस्ताच लहान करण्याच्या हालचाली चालु आहेत.या रस्त्यावर मोठी वर्दळ असल्यामुळे हा रस्ता शंभर फुटाचाच होणे गरजेचे आहे. मुठभर लोकांना खुश करण्यासाठी शहराचे वाटोळे करून नका,महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत शंभर फुटाचाच रस्ता करा, व २७ ऑगस्ट पर्यंत काम करा अन्यथा २८ऑगस्ट पासूनअन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी दिला आहे.
चौकट
रस्त्याच्या बाजूला असलेल्या शाॅपीग सेंटर च्या आतील जागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे.हा पुतळा समोर आणा अशी मागणी मांतग समाज बांधवांची गेल्या अनेक वर्षांपासून आहे.जर हा रस्ता अंदाज पत्रकानुसार शंभर फुटाचा झाला तर शाॅपीग सेंटर पाठीमागे जाईल व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनी भागात येईल… महापुरुषांनचा मानसन्मान होईल… बालाजी चुक्कलवाड