कालच पुस्तकाचं एडीटींग पूर्ण केलं आणि आज सकाळी सकाळी कलरफुल माझ्या वॉलवर गेले अर्थातच मेसेंजरवर.. काय काय दिवे लावलेत मित्रांनी चेक करायचं होतं.. कारण त्याशिवाय पुरूष हृदय लिहीणार कसं ना..
लैंगिक शिक्षणाची गरज आजही किती आहे हे यावरुन समजतं.. एकाने विचारलं होतं , तुमचं बिकीनी सेक्स बुक हवय मॅम.. याला नक्की काय म्हणायचं असेल भाऊ.. तरीही बरं मी साध्या भाषेत लिहीते आणि जास्तीत जास्त मराठीत बोलते..
माझी मुलाखत व्हायरल झाल्यापासून नुसता वात आणलाय यांनी , एक तर मुलाखत पूर्ण ऐकत नाहीत फक्त सेक्स शब्द वाचतात आणि मेसेज केलेत , मॅम सेक्स व्हीडीओ पाठवा.. या पॉर्न ने आपली वाट लावलेय त्यामुळे लैंगिकतेतील पावित्र्य आणि शास्त्रीय ज्ञान पूर्णपणे हरपलय आणि राहीलेय ती वासना.. गावाकडील मंडळी आजही याचं अज्ञान घेउन वावरत आहेत याची खंत आहे..
पुण्यासारख्या सीटीमधे सुध्दा लोक अनेक प्रश्न विचारतात , एकाने लिहीलय , माझं दोन मिनीटात गळतं , मी काय करु ??.. तरीही तुम्ही म्हणता , मॅम लैगिक शिक्षणाची गरज आहे का ??.. मी विचार करते ,असे अनेक प्रश्न स्त्रीयांनाही पडायला हवेत पण स्त्री स्त्रीला विचारत नसावी बहुधा.. की त्यांना सगळं माहीत आहे किवा जाणून घ्यायचे नाही किवा उघडपणे नको.. असच काहीसं दिसतय..
प्रश्न तर पडायलाच हवेत ना..
एकाने लिहीलय मॅम मला gf हवेय.. काय करावं लागेल ??.. अरे भावा आधी बायको सांभाळ , तिलाच gf बनव ..खिशात नाही आणा आणि मला…….. म्हणा हे नको..
बायको जमवुन घेइल . gf नाही घेणार
एकाने लिहीलय मॅम तुम्हीच म्हणता ना हेल्दी फ्लर्टींग करा मग मला तुमच्यासोबत फ्लर्टींग करायचय करु का ?? .. अरे मित्रा मी रोज सकाळी सांगते हरीनाम घ्या.. घेता का ??.. तेवढच कसं लक्षात रहातं रे.. माझ्यासोबत फ्लर्टींग करणं तुला झेपणार आहे का ??त्यापेक्षा हरीनाम घे.. कल्याण होइल..
अजुन एक गमतीदार किस्सा , मला हस्त मैथुन आवडतं त्यामुळे बायकोची धोंड गळ्यात बांधुन घ्यायची नाही पण तुमच्यासारखी हॉट मिळाली तर मी लग्न करेन.. हा काय विरोधाभास आहे काही कळेना.. सचिन ला सकाळी सकाळी सगळे मेसेजेस वाचुन दाखवले आणि कॉफीसोबत आमच्या झुल्यावर दोघेही मनसोक्त हसलो.. हसुन हसुन आमचं हृदय मजबूत झालं आणि जबड्याचा व्यायाम झाला..
मित्रांनो तुम्ही कायमच आम्हाला आनंदी ठेवता मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.. अजुन शेकडो मेसेजेस आहेत पण वाचायला वेळ नाही.. माझं पुरूष हृदय तुम्हीही तितक्याच स्पोर्टींगली घेता आणि मी तो नव्हेच म्हणत पुन्हा नवीन जोमाने फ्लर्टींग करता.. हीच आयुष्याची मजा आहे.. मला कधीही त्रास होत नाही आणि रागही येत नाही पण हेल्दी खा आणि हेल्दी फ्लर्टींग करा रे..
सोनल गोडबोले..