-बिलोली ; नागोराव कुडके
बिलोली येथिल कोविड केअर सेंटरला रामतिर्थ पोलीस स्टेशन व अंतर्गत येणाऱ्या बेळकोणी येथील मुस्लिम समाज बांधवाकडून चटई व प्लास्टिक खुर्च्या भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली .
जगभरात थैमान घातलेल्या कोरोणा विषाणू या संसर्गजन्य आजाराने ग्रस्त असलेल्या बिलोली तालुक्यातील रूग्णास रोज सकाळी योगासने करण्यासाठी रामतिर्थ पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ शिंदे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी राखत रूग्णास बारा चटई भेट देण्यात आली. याच पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेळकोणी (खु) येथील मुस्लिम बांधव हे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने व उत्साहपूर्ण वातावरणात मोहरम करीत होते.
यावर्षी मात्र या परंपरेला फाटा देत मोहरम सण साजरा न करता जमा झालेल्या रक्कमेतून बिलोली शहरालगत असलेल्या सुलतानपूर येथिल आय.टि.आय मधील कोविड केअर सेंटरला दहा खुर्च्या भेट देण्यात आले. या समयी रामतिर्थ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिन्दे, ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डाॕ
. नागेश लखमावार , बिलोली पोलिस स्टेशनचे पो.नि.शिवाजी डोईफोडे, पो.काॕ.सोनकांबळे तसेच बेळकोणी (खु) चे सरपंच प्रतिनिधी जावेद पटेल,शादुल सरवरशा,बक्सू हैदरशा,बाबू शाह मिराशाह,मुस्तफा देसाई,मौला देसाई ,मकदुम जमनशाह,पत्रकार रत्नाकर जाधव, बस्वराज वाघमारे, पंढरीनाथ गायकवाड यांची उपस्थिती होती.