निसर्ग हा सृष्टी,पाणी,अग्नी,वायू व आकाश या पंच तत्वांनी बनलेला आहे.मानवाचे आणि निसर्गाचे नाते अगदी जवळचे जीवाभाचे आहे.खरं तर निसर्ग हा मानवी जीवनाला मीळालेले वरदान आहे.निसर्ग हा आपल्याला बरच काही शिकवतो.
संकटातही तो आपल्याला हसायला शिकवतो.वादळ वार्यामध्ये वृक्षासारखं तटस्थ ऊभं राहायला ऊन,वारा झेलायला शिकवतो.निसर्ग हा मोहमयी चित्रकार आहे.निसर्ग विविध रंग,गंध,लावण्यांनी नटलेला आहे.त्यापासून आपल्याला जगण्याची ऊर्मी मीळते.त्याच्यापासून आपल्याला रोज काही ना काही अनुभव येतो.
आपल्याजवळ जे आहे ते इतरांना देत राहावं हा मंत्र तो देतो.जीवनात येणा-या संकटांनी हाताश न होता त्याला हसत हसत सामोर जावं ही महत्वपूर्ण शिकवण तो देतो.रोज उगवणारा सूर्य आपल्याला ऊठा कामाला लागा,कष्टाची तयारी ठेवा,याची जाणीव करुन देतो.निसर्गाने आजपर्यंत मानवाच्या प्रत्येक प्रगतीत मोलाची साथ दीली आहे.
मानवाने अनेक शोध लावले,रस्ते बांधले,गगणचुंबी इमारी बांधल्या,एवढेच काय आकाशाला गवसणी घालत उंच भरारी मारली,याची प्रेरणा मानवाला निसर्गानेच दिली.निसर्ग मानवाला जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवतो.चांगले कर्म आणि फळाची अपेक्षा ठेवू नका,हे तो आपल्या कृतीतून सिध्द करतो.
निसर्ग आपला गुरु तर आहेच तो एक उत्तम डाॅक्टर देखील आहे.काट्यात राहूनही फुलाप्रमाणे हसण्याचा संदेश निसर्ग देतो.नीसर्घ आपला दाता व आपण त्याचे याचक आहोत.
निसर्गासारखा गुरु आणि सच्चा मित्र आपल्याला शोधूनही सापडणार नाही.तेव्हा आपले कर्तव्य आहे की,नीसर्गाचे संतूलन आबाधीत ठेवले पाहीजे.तरच,मानवी जीवन सुखी होइल.ज्या प्रमाणे एखादा गुरु आपल्या शिष्यांना अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेउन जातो.
संस्काराचे अमृत पाजतो.एक परीपूर्ण व्यक्ती म्हणून घडवतो.तसेच निसर्ग देखील आपल्याला उदारपणा,धैर्य,साहस याची शिकवण देतो.आपण मात्र नीसर्गाला कायम आपल्या स्वार्थासाठी उजाड,भकास करत आहोत.त्यामूळे मोठ्याप्रमाणात वृक्षतोड होत आहे.
त्यामूळे ग्लोबल वार्मिन,सारख्या अनेक प्रदुषणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.निसर्गाला हानी पोहचवणे म्हणजे मानवी जीवनाचा विनाशच आहे.एवढ सगळ होऊनही नीसर्ग बापडा आहे तेवढे भरभरुन देण्याचा प्रयत्न करतो…सतत काही ना काही देण्याचा वसा त्याने जणू काही अंगिकारला आहे.
निसर्ग निर्घृण त्याला मूर्वत।
नाही अगदी पहा कशाची।
कालासम जी क्रीडा त्याची।
ती सकलांना समान जाची।
चुरुन टाकी प्रचंड पर्वत।
कवि केशव सुतांच्या या कवीतेच्या ओळी,माणसाहून निसर्ग केवढा श्रेष्ठ आहे याची जाणीव करुन देतात.
रुपाली वागरे/वैद्य
९८६०२७६२४१