कंधार ; प्रतिनिधी
नांदेड-बिदर राष्ट्रीय महामार्गा वरून नांदेडहून उदगिरकडे मुर्गी चारा घेऊन जानारा ट्रक कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीच्या पुलावर आले असताना खड्डे चुकविताना ट्रक थेट पुलाच्या कठाड्याला २४ रोजी अडकला होता. दोन दिवस अडकलेल्या ट्रक काढण्यासाठी ट्रक मालकाने भरपुर प्रयत्न केले. पण सगळे प्रयत्न अपयशी ठरले अन् शेवटी २७ च्या पहाटे ट्रक मन्याड नदीपात्राच्या पाण्यात पडला. अन् तो ट्रॅक ३१ रोजी दोन क्रेनच्या साहाय्याने ३ च्या सुमारास नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. यावेळी अनेकांनी ट्रक पाहण्यासाठी गर्दी केली होती.



