कंधार/प्रतिनिधी
आंबटवाड कुटुंब आणि धोंडगे कुटुंब वेगळे नाहीत. दिवंगत डॉ. भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या सोबत त्यांनी काम केले आहे. त्यांनी ३६ वर्ष संस्था व महाविद्यालयाचे कामकाज अतिशय जबाबदारीने पार पडले आहे. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य महत्वाचे आहे असे स्पष्ट करून श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी प्रा.आंबटवाड यांचे उर्वरित आयुष्य सुखी आणि समृद्ध जावे यासाठी सदिच्छा व्यक्त केले.
येथील श्री शिवाजी कॉलेजमध्ये बुधवारी प्रा. आंबटवाड यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे सहसचिव ॲड.मुक्तेश्वरराव धोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. ते म्हणाले की, तुम्ही आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहात. पण आमच्या हृदयात तुम्ही कायम आहात. तुमचे आणि आमचे फार जवळचे ऋणानुबंध आहेत. हे ऋणानुबंध जीवनभर राहणार असल्याचेही त्यांनी पुढे म्हटले.
सत्काराला उत्तर देताना प्रा.आंबटवाड म्हणाले की, भाई केशवराव धोंडगे साहेबा सोबत माझं पुर्ण आयुष्य गेल.भाईचे शैक्षणिक,सामाजिक, व राजकीय कारकीर्द मी जवळून पाहिलो व अनुभवलो. केशवरावांचे कार्य हे प्रेरणादायी होते. भाईंच्या कार्याला उजाळा देताना प्रा.आंबटवाड हे भावुक झाले होते.संस्था व महाविद्यालयाचे माझे जवळचे,जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध होते.आणि पूढेही राहातील.असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.अशोक गवते म्हणाले की,प्रा.शंकरराव आंबटवाड हे डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या कूशीतुन वाढलेलं नेतृत्व आहे. प्रा.शंकरराव हे डॉ.भाई धोंडगे साहेब यांच्या बरोबर राहायचे. त्यांनी महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाचे अध्यापनाचे ३६ वर्ष केले. अध्यापणामध्ये कधीही कुचराई केले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मारोतराव जायभाये,नारायणराव चिवडे, व्हि. जी. चव्हाण, प्राचार्य डॉ. धर्मापुरीकर, संस्था उपाध्यक्ष माधवराव पेठकर,प्रा.लिलाताई आंबटवाड,सदस्य गुरुनाथराव पेठकर,प्राचार्य डॉ.सुर्यकांत जोगदंड उपस्थित होते. माजी
मु.अ.सुधीर कुरुडे,प्रा.निनायक मोरे,राजाराम फेदेवाड,व्यंकटराव चिवडे,नातेवाईक,मित्रमंडळी, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुर्यकांत जोगदंड यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.पांडुरंग पांचाळ यांनी तर आभार प्रा.दिलीप सावंत यांनी मानले.