कंधार/मो सिकंदर
कंधार शहराला चोही बाजूने मुबलक पाणी उपलब्ध असुन सुद्धा नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहराला दोन ते तीन दिवस आड कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात असल्याने धरण उशाला असुन सुद्धा शहर तहानलेला असल्याने संतापाची लाट पसरली आहे.
सध्या कंधार नगर परिषदेचा कार्यकाळ संपला असल्याने सध्या कारभार प्रशासक नेमण्यात आले. मुख्याधिकारी यांची बदली झाली असल्याने दोन्ही पदभार कंधार तहसीलदार यांच्याच कडे असल्याने येथील नागरिक मोठ्या अपेक्षेने या कडे पाहत होते.पण येथील नागरिकांच्या समस्या सुटण्या ऐवजी समस्येत दिवसेंदिवस वाढत चालली असल्याची गावभर चर्चा सुरू झाली आहे. शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे,
सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कंधार शहराच्या चोही बाजूने मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे. लिंबोटी धरण, मन्याड नदी, जगतुंगसागर येवढ सर्व काही असतानाही पाणी पुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहराला दोन ते तीन दिवस आड कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याने प्रशासक साहेब या कडे लक्ष देतील का अशी चर्चा शहरात होतांना ऐकावयास मिळत आहे.