…या ग्लोबल दुनियेत सारं काही झ्याकप्याक झालं खरे पण…हरवला तो ख-या आनंदाचा झरा आणि मायेचा स्रोत उरल्यात फक्त आठवणी ….आजही ते क्षण आठवले की मन कसं प्रसन्न होते …आणि तीचं उर्जा या धकाधकीच्या , कोरड्या भावनाशून्य नेटयुगात मनाला बळ आणि माया पुरवते .
आजही सूर्यचंद्र उगवतात, मावळतात …आत्ताची सकाळ सुरू होते… आणि लगेच सारं विश्व पाच सहा, सात इंचाच्या मोबाईलमध्ये सामावून घेते…. त्याला न कुठलं अंगण न कुठल बंधन ना कुठला ओलावा ना खोलवरचा जिव्हाळा यातचं गुरफटलेली दुनिया … यांना कसं कळणार घर, अंगण , सृष्टीसौंदर्य ! दिनचर्याचं मुळात मुक्या चित्रजगात सुरू होते आणि त्यातचं रात्र विरते आजूबाजूला एक रिअल जग आहे याचेसुध्दा भान नाही. पण आभासी जगात मात्र माणूस सदैव मग्न .इंटरनेटच्या युगात प्रगती फास्ट होतेयं खरी परंतु मानसिक अधोगतीही तेवढीचं होत चाललीय अन माणूस सवयींचा गुलाम झाला , एक अनामिक शक्ती आपल्या माणसाला माणसापासून दूर करत चाललीयं हेही तितकेच खरे …आपण दिवसेंदिवस यात अडकत चाललोय एक पाश आपल्याभोवती रोज करकचून आवळला जातोयं …गुदरमरून जायला होते इतका घट्ट असा…
काळानुसार बदलायला हवं हे जरी खरे असले तरी वाहवत जाऊन भरकटलेल्या रस्त्यावर कसे आणि कुठे थांबले पाहिजे याची समज , जाण असायला हवीचं ना ! आजच्या सुक्षीशीत , माँर्डन जिंदगीपेक्षा अडाणी पण दुरदृष्टी असलेली जीवनशैली नक्कीच चांगली सुदृढ होती .असे मला तरी वाटते . पाँश बंगले फ्लॅट आले खरे पण बंद दाराआडच्या संस्कृतीने माणसांची मनाची दरवाजे बंद केलेत. संकुचित ,सेल्फीश प्रवृत्ती उदयास येत आहे.न मातीचा गंध न कोवळ्या सूर्यकिरणांना त्यात जागा .न माणुसकीचा जिव्हाळा…
खरंय ना…
सौ.रूचिरा बेटकर नांदेड
9970774211