पत्रकार विश्वंभर बसवंते यांना दैनिक “वृत्त महानगर “चा मूकनायक पत्रकारिता पुरस्कार जाहीर…

 

कंधार: प्रतिनिधी

दैनिक “वृत्त महानगर”या वृत्तपत्राच्या वतीने देण्यात येणारा सन २०२३ या वर्षाचा “मूकनायक पत्रकारिता” पुरस्कारासाठी दै. एकमतचे कंधार तालुका प्रतिनिधी विश्वंभर बसवंते यांची निवड झाल्याचे पत्र ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. गंगाधर तोगरे, युगसाक्षीचे संपादक दिगांबर वाघमारे, पत्रकार राजेश कांबळे, यांच्या उपस्थितीत दैनिक “वृत्त महानगर” चे संपादक कुलदीप सूर्यवंशी गोणारकर यांच्या हस्ते देण्यात आले.

“मूकनायक पत्रकारिता” या पुरस्कारासाठी विश्वंभर बसवंते यांची निवड झाल्याने कंधार येथील सर्व मित्रमंडळी यांच्याकडून अभिनंदन केल्या जात आहे.

दैनिक “वृत्त महानगर” या वृत्तपत्राच्या वतीने गतवर्षीपासून सर्वसामान्य वाचकांच्या आणि हितचिंतकांच्या भरभक्कम पाठबळावर या वृत्तपत्राची वाटचाल सुरू असून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्नेह मेळावा, तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा “सन्मान सोहळा” व दैनिक “वृत्त महानगर सन्मान पुरस्कार वितरण”दैनिक वृत्त महानगरचे संपादक मा. कुलदीप सूर्यवंशी गोणारकर, कार्यकारी संपादक मा. रणजीत गोणारकर, सहसंपादक मा. विजयकुमार वाघमारे यांच्यावतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

दि. ५ सप्टेंबर २०२३ रोज मंगळवारी सकाळी ११:०० वाजता गणराज हॉटेल, नमस्कार चौक एम.जी.एम.कॉलेज जवळ नांदेड येथे दैनिक “वृत्त महानगर” द्विपुर्ती वर्धापन व सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर तर उद्घाटक म्हणून नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी मा. पांडुरंग बोरगावकर, विशेष अतिथी म्हणून आमदार बालाजीराव कल्याणकर ,आमदार मोहन अण्णा हंबर्डे,राज्य मार्गदर्शक, जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेडचे बालाजी शिरशीकर,गोदावरी समूहाच्या अध्यक्षा सौ.राजश्री पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे,सिने अभिनेते तथा दिग्दर्शक डॉ. प्रमोद अंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *