बहुजन रयत परिषदच्यावतीने अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न …

नांदेड : प्रतिनिधी

बहुजन रयत परिषद नांदेडच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत आवड निर्माण व्हावी म्हणून रविवार दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता राजयोग पॅलेस, नमस्कार चौक,नांदेड आयोजित कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहुजन रयत परिषद नांदेड शहराध्यक्ष माजी मुख्याध्याफक भारत कलवले यांनी केले.

या कार्यक्रमात एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी.,पी.एस.आय., एस. टी.आय., ए.एस.ओ. व इतर स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रोफेसर डॉ. माधव बसवंते भूषविले होते,तर कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा अँड. कोमलताई साळुंखे , प्रदेशउपाध्यक्ष प्राध्यापक ना.म. साठे, प्रदेश सचिव मा.ईश्वरजी क्षीरसागर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे, दत्तात्रय पाटील, सतिश गोटमुकले, माननीय मुख्याध्यापक अमोलभाऊ केंद्रे, बहुजन रयत परिषद नांदेडचे जिल्हाध्यक्ष श्री. साहेबराव गुंडीले, प्रा.सज्जन कदम प्रमुख मार्गदर्शक राज्यसेवा अकॅडमी पुणेरी पॅटर्न नांदेड .

 

यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सी.एल.कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभारप्रदर्शन बालाप्रसाद भालेराव यांनी केले.या भरगच्च कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते,कर्मचारी,अधिकारी,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्थेने उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *