धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे )
शिक्षण हे अगदी गंगाजला प्रमाणे श्रेष्ठ आणि शुद्ध असते. किंबहुना ते गंगाजलापेक्षाही श्रेष्ठ आणि शुद्ध आहे.त्यामुळे प्रत्येकाचा व्यक्तिमत्त्व विकास आणि त्यातूनच राष्ट्राचा विकास होतो. असे प्रतिपादन प्रा डॉ कोकणे जे पी यांनी केले.
ते येथील कै शं गु ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ होळंबे टी एल होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला
थोर शिक्षणतज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रमाणे माणूस शिक्षणामुळे सर्वोच्च पदापर्यंत पोहचतो. प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचा धांडोळा घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन प्रा डॉ रमाकांत गजलवार यांनी केले. आभार प्रा मुंडे ए डी यांनी मानले.