मुख्यमंत्री,गृहमंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले

पेठवडज ; प्रतिनिधी ( कैलास शेटवाड )

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. ४) रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने पेठवडज (ता. कंधार) येथे मुख्यमंत्री- गृहमंत्र्यांचे पुतळे जाळून आंदोलन करण्यात आले. सोमवारी तालुक्यातील पेठवडज येथे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांचे पुतळे दहन करुन एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, लाठीचार्ज करणाऱ्या सरकार व गृहमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कौठा आणि बारुळ येथे बंद पाडून झालेल्या गंभीर प्रकरणाची त्वरित दखल घेवून दोषीवर कडक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *