कंधार ; प्रतिनिधी
श्री क्षेत्र उमरज येथे श्री संत नामदेव महाराज यांचा २५१ वा जन्मोत्सव व श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्या निमित्त अखंड हरीनाम सप्ताह दि.३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान हरिनाम सप्ताहाचे आयोजन व ४ सप्टेंबर रोजी पादुका स्थापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.संस्थानचे मठाधिपती श्री एकनाथ गुरु नामदेव महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार संस्थानच्या वतीने अध्यात्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक कार्याचे आयोजन करण्यात आले .
दि.६ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीर व मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले. १२०० रुग्णांची तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले.
नांदेड येथील डॉ.डुब्बे व ग्रामीण रूग्णालय कंधार येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत मोरे,डॉ.गजानन पवार, डॉ.अरुणकुमार राठोड, डॉ.शाहिन बेगम, डॉ.उजमा तबसुम,डॉ.नम्रता ढोणे, औषध निर्माता अधिकारी दिलिप कांबळे,शंकर चिवडे,लक्ष्मण घोरपडे,परिचारिका प्रियंका गलांडे,सुरेखा मैलारे,सुनिता वाघमारे,अशोक दुरपडे,शेख सरवर आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात जवळपास १७० तरुण भाविक भक्तांनी रक्तदान केले.नांदेड येथील गुरु गोविंदसिंग व्हलेटरी ब्लड सेंटरचे शिवदास कदम,किरण राठोड,कपिल वाढवे,महेंद्र,नामदेव पांचाळ,आदि कर्मचाऱ्यांनी ब्लड संकलित केले.वैधकिय अधिकारी कर्मचारी व ब्लड सेंटरच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मठाधिपती महंत एकनाथ महाराज यांनी आभार मानले.७ सप्टेंबर रोजी ह.भ.प.गुरुवर्य एकनाथ गुरु नामदेव महाराज उमरजकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा.
३१ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान संत नामदेव महाराज संस्थांनच्या वतीने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह,हरिजागर,राम कथा,कृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.या कार्यक्रमात हजारो लहान थोर भाविकभक्त माता भगीनी स्वयंस्फूर्तीने व आनंदाने सहभागी होतात.
रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबिरात भक्तांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन आध्यात्मिक कार्यारोबरच सामाजिक कार्य जोपासली जात आहेत.
— श्री महंत एकनाथ गुरु नामदेव महाराज
(मठाधिपती -श्री संत नामदेव महाराज मठ संस्थान उमरज)