निवडणुकीत जय पराजय होत असतो. काही उमेदवार अत्यंत कमी मताने 2,3,4,5 च्या फरकाने पडले. पण लढत काय असते ते दाखवुन दिले…
कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात आमच्याशिवाय कोण्हीही नाही.आम्हीच सर्वस्वी आहोत म्हणून मिरवणारे त्यांना 2 जागा भलेही जास्त मिळाल्या असतील पण लढत देणारी एक टीम समोर आहे हेही दिसून आले असेल.
या *निवडणुकीत आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब व शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांच्या नेतृत्वाची नोंद घ्यावी अशी कामगिरी केली…*
ही *निवडणूक आम्ही एकतर्फी जिंकणार असा बडेजाव करणाऱ्या स्वयंघोषित वाघाला घाम फुटला हेही तेवढंच सत्य आहे. कारण मतदारांना पळवून नेणे,आमिषे दाखवणे ई. वापर* *करूनही काठावर बहुमत मिळाले.*
एका *पराभवाने सर्व संपले अस होत नाही.*
*नियोजन उत्तम होते,कार्यकर्त्यांची मेहनत होती. पण नकळत कुठंतरी कमी पडल्यामुळे फटका बसला असेल. या पराभवाच्या चुकातून बोध घेऊन खचून न जाता नवीन भरारी घेण्याची* तयारी करावी..
कारण *कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी*
*आमदार श्यामसुंदरजी शिंद साहेब व सौ.आशाताई शिंदे यांचा पाठिंबा नेहमीच राहील* …