स्थानिक गुन्हे शाखेकडुन 15 लाख 31 हजार रुपयाचा 71 किलो 550 ग्राम गांजा जप्त ; तिन आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही

 

 

नांदेड ; प्रतिनिधी

पोलीसठाणे विमानतळ हद्दीमध्ये कामठा (खु.) माळटेकडी गुरुव चौक, नांदेड कडे काही इसम एन डी पी एस कायदयाच्या तरतुदीचा भंग करुन अंमली पदार्थ गांजाची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने घेवुन जात आहेत अशी खात्रीशिर माहीती स्थागुशाचे पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे यांना मिळाली..

त्यांनी मिळालेली माहीती वरीष्ठांना देवुन त्यांचे आदेशाने स्थागुशाचे पोलीस अमलदार, महीला पोलीस अमलदार, महसुलचे राजपत्रीत अधिकारी व पोलीस राजपत्रीत अधिकारी यांना सोबत घेवुन आज दिनांक 06/09/2023 रोजी 11.30 वाजता मिळालेल्या माहीतीचे ठिकाणी माळटेकडी गुरुवदारा जवळील ओव्हर ब्रीजचे खाली जावुन सापळा रचुन थांबले असताना, 12.55 वाजताचे सुमारास एक काळया रंगाचा अॅटो क्रमांक एम एच 26 बी डी 4509 हा आला. नमुद अॅटोची पंचासमक्ष तसेच राजपत्रीत अधिकारी यांचे समक्ष झडती घेतली असता,

त्यामध्ये अमली पदार्थ गांजाचे प्लॅस्टीकमध्ये छोटे व मोठे पॉकेट असा 71.550 किलो ग्राम ओलसर गांजा किंमती 15,31,000/- रुपयाचा मिळुन आला. सदरचा गांजा वाहतुक करत असतान नमुद ऑटोमध्ये आरोपी नामे 1) मिर्झा मोसीन नजीर वेग वय 22 वर्ष व्यवसाय अॅटोचालक रा. मुजामपेठ धनेगाव नांदेड 2) सयद मुक्तार महमद सलीम वय 35 वर्ष व्यवसाय बेकार रा. हिंगोली नाका नांदेड 3) परविन बेगम भ्र. सयद मुक्तार वय 30 वर्ष व्यवसाय बेकार रा. हिंगोली नाका नांदेड हे मिळुन आले. मिळुन आलेल्या आरोपीतांनी सदरचा गांजा हा 4) जोहराबी ऊर्फ बब्बा खाला भ्र. अन्वर खान पठाण रा टायरबोर्ड नांदेड हीने विक्री करण्यासाठी दिला असल्याचे सांगीतले आहे.

मिळुन आलेला अमली पदार्थ गांजा जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपीताविरुद्ध पोउपनि / दत्तात्रय काळे यांचे फिर्यादवरुन पोलीस ठाणे विमानतळ येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोनि / नागनाथ आयलाने, पो स्टे विमानतळ, नायब तहसीलदार/ के. बी. डांगे, पोउपनि / दत्तात्रय काळे, सपोउपनि/ माधव केंद्रे, पोह/ गंगाधर कदम, बालाजी तेलंग, पोकों/विलास कदम, गणेश धुमाळ, रणधीर राजबन्सी, महेश बडगु गजानन बयनवाड मपोहेकॉ / पंचफुला फुलारी, महेजबीन शेख, चालक पोकों/अर्जुन शिंदे, कलीम शेख स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

 

जनसंपर्क अधिकारी पो. अ. कार्यालय नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *