मुखेड : उपक्रमशील शिक्षक तथा लोकबोली अभ्यासक,अनुवादाच्या आनंद शाळेचे जनक श्री.शिवाजी आंबुलगेकर यांच्या शैक्षणिक बांधिलकीची व विद्यार्थ्याप्रतीच्या वैविध्यपूर्ण उपक्रमशीलतेची दखल घेऊन पुणे येथील लेक्सिकन समूहातर्फे दिला जाणारा ‘श्रीमती कमल शर्मा शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार २०२३’ ने वाघोली पुणे येथील लेक्सिकन सभागृहात विशेष कार्यक्रमाद्वारे आज दिनांक ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी आंबुलगेकरांना सन्मानित केले जाणार आहे.
यापूर्वी त्यांना झी २४ तास या वृत्तवाहिनीने ‘अनन्य’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.गारगोटीच्या मौनी विद्यापीठाचा ‘जे.पी.नाईक पुरस्कार’ही त्यांना मिळालेला आहे. विद्यार्थ्याप्रती समर्पित सेवाभावाने काम करणाऱ्या सेवावृत्ती मानबिंदूचा हा सन्मान मायबोली मराठी गणगोतासाठी अभिमानाची बाब आहे.
या पुरस्कार निवडी प्रित्यर्थ मायबोली गणगोताचे प्रकाश पवार, साधना पेंढारकर,डाॅ.दिलीप पुंडे, डाॅ.प्रकाश पांचाळ,डाॅ.रामकृष्ण बदणे,ज्ञानोबा जोगदंड,एकनाथ डुमणे,सुरेश पाटील,नामदेव यलकटवार,गजानन गेडेवाड,
शेषराव वडजे,संतोष तळेगावे, सुरेश जमदाडे आदिंनी अभिनंदन केले आहे.