महात्मा फुले शाळेत शिक्षक दिन साजरा ; चिमुकल्याने केला आपल्या शिक्षकांचा सत्कार

 

कंधार ; प्रतिनिधी

कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळेत आज ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला .

शिक्षक दिनानिमित्त शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला . यावेळी प्रमुख पाहुणे के . पी.नवघरे यांच्या हस्ते मुख्याध्यापक वाघमारे डी . जी यांचा सत्कार करण्यात आला .
तसेच शाळेतील शिक्षिका सौ यु.एम कागणे , आनंदा आगलावे , राजू केंद्रे , चंद्रकला तेलंग , माणिक बोरकर यांचा विद्यार्थ्यांनी सत्कार केला .

यावेळी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जिवन चरित्रावर भाषणं केली . गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बक्षिस देवून केला .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु अदिती कागणे ने व आभार श्रावणी जायभाये हीने केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *