मुखेड: प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र मुखेड येथे परमपूज्य गुरुमाऊली यांचे सुपुत्र आबासाहेब मोरे यांचे दिनांक १० सप्टेंबर रोज रविवारी दुपारी १२ वाजता आगमन होणार आहे.
यावेळी केंद्रात विविध विषयांवर आबासाहेब मार्गदर्शन करणार आहेत.त्यानंतर कृषी, पर्यावरण, विवाह, स्वंयरोजगार या विभागांना भेटी देणार आहेत. सर्व सेवेकऱ्यांनी गुरुपुत्रांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र मुखेडच्या वतीने करण्यात आले आहे.