कंधार ; प्रतिनिधी
बीटस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी कें.प्रा.शा.शिराढोण येथे उस्मानगर व बारुळ बीटमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.शिक्षण विस्तार अधिकारी श्री.वसंत मेटकर यांच्या संकल्पनेतून शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान करण्याचे हे दहावे वर्ष आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री खुशालराव पांडागळे (सरपंच शिरढोण) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कंधार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री.बालाजीराव शिंदे,शिक्षक पतपेढी नांदेड चे संचालक श्री.जोगपेटे,केंद्रप्रमुख श्री.वाघमारे एन.एम,श्री.काळे सर,श्री.ढोणे सर ,श्री.दिनकर सर हे होते.प्रत्येक केंद्रातून दोन शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यामध्ये कौठा केंद्र सौ.सुनिता वल्लमपल्ले,श्री.बळवंत डावकरे, मंगलसांगवी केंद्र श्री.विजय पल्लेवाड,सौ.शिवकांता मुदखेडे, बारूळ केंद्र श्री.विशाल शिंदे,श्री.गंगाधर ननुरे, उस्माननगर केंद्र श्रिमती सुनंदा पाटोदेकर,श्री.प्रल्हाद सुर्यवंशी, केंद्र शिरढोण श्री.बाबाराव विश्वकर्मा,सौ.उमा निलावार,चिखली केंद्र श्री.बालाजी माकणे,श्री.अंगद येनगे यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
आव्हानात्मक परिस्थितीत उत्कृष्ट काम करणारे फक्त शिक्षकच असतात असं पुढे बोलताना गटशिक्षणाधिकारी म्हणाले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी मनोगत मांडतांना मेटकर साहेबांनी शिक्षकदिनी सन्मान करून मोठी प्रेरणा दिल्याचा आनंद व्यक्त केला. प्रास्ताविकात शि.वि.अ. मेटकर साहेबांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांविषयीच्या कार्याचा उल्लेख केला तर अध्यक्षीय समारोप करताना श्री.पांडागळे यांनी शिक्षकांनी समर्पित भावनेने कार्य करावे असे सांगितले.शेवटी आभार श्री.काळे सर यांनी व्यक्त केले.