विजय पवार संपादित कविता पावसाच्या कविता संग्रह प्रकाशनासाठी सज्ज.

अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )

महाराष्ट्र माझा या स्वलिखीत कविता संग्रहाच्या यशानंतर कवी विजय पवार संपादित ‘ कविता पावसाच्या ‘ हा प्रातिनिधिक कविता संग्रह गुरूमाऊली प्रकाशन उदगीरने प्रकाशनासाठी सज्ज केला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.पुरोगामी साहित्य परिषद अहमदपूरने या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले आहे.
सदरील प्रातिनिधीक कविता संग्रह ‘ दुत पावसाचा ‘ या ग्रंथाचे रचनाकार, हरित क्रांतिचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या कार्यास अर्पण करण्यात आला आहे.
या संग्रहात एन डी राठोड, वैजनाथ कांबळे, प्रा शिवा कराड, रंजना गायकवाड, प्रा भगवान आमलापुरे, गणेशराव चव्हाण, लक्ष्मणसुत, प्रा डॉ रमाकांत गजलवार,विजय पवार, किरण गोंदगे,सौ बालिका बरगळ, मुरहारी कराड, वर्षा लगडे – माळी, शिवकांता शिंदे, बालासाहेब पांचाळ, प्रा ज्ञानेश्वर गायकवाड, मदनराव आंभोरे, सय्यद चाँद तरोडकर आणि प्रा संजीवकुमार भोसले यांच्या कवितांचा समावेश आहे.
दरम्यान याच प्रकाशन समारंभात ‘ गारपीट ‘ या प्रा भगवान आमलापुरे लिखित कविता संग्रहाचे प्रथम प्रकाशन होणार आहे. या विमोचन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक पुरोगामी साहित्य परिषदेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *