खासदार समर्थक प्रदीप पाटील फाजगे यांचा असंख्य कार्यकर्त्यासह शेकाप मध्ये जाहीर प्रवेश ..! लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक रणधुमाळीत भाजपा गटाला मोठा धक्का

लोहा ; प्रतिनिधी

तालुक्यातील दगडसांगवी येथे काल दिनांक १० सप्टेंबर रोजी 30 लक्ष रुपयाच्या सीसी रस्त्याचे भूमिपूजन व शेतकरी कामगार पक्ष प्रवेश सोहळ्यास शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते सी.सी. रस्त्याचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले .

 

यावेळी खासदार समर्थक असलेले दगड सांगवीचे सरपंच प्रदीप पाटील फाजगे यांनी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या खंबीर विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून दगडसांगवी चे सरपंच प्रदीप पाटील फाजगे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शेतकरी कामगार पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला.

 

यावेळी आशाताई शिंदे यांनी शेकापमध्ये जाहीर प्रवेश केलेल्या सरपंच प्रदीप पाटील फाजगे यांच्यासह प्रवेश केलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचा शाल पुष्पहार घालून स्वागत केले. आमदार शिंदे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून लोहा कंधार मतदार संघातील अनेक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते शेकापमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याने आमदार शिंदे यांचे मतदारसंघात पारडे भक्कम होत असल्याने आमदार शिंदे यांच्या विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 

दगड सांगवी येथील शेकाप पक्षप्रवेश सोहळा व सी.सी. रस्ता भूमिपूजन सोहळ्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी दगडसांगवी येथील गावकऱ्यांशी बोलताना म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षात अनेक पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून जाहीर प्रवेश करत असून शेतकरी कामगार पक्षात पक्ष प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना आमदार शिंदे यांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करत असून शेकापच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर कधीही अन्याय होणार नाही याची आम्ही दक्षता घेत असल्याचे आशाताई शिंदे यांनी बोलताना सांगितले.

 

दगडसांगवी गावच्या सर्वांगीण मूलभूत विकासासाठी निधीची कदापी कमतरता भासणार नसून दगडसांगवी गावचा मूलभूत विकास करण्यासाठी आमदार शिंदे साहेब भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी कट्टीबद्ध असल्याचे यावेळी आशाताई शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले. लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार समर्थक दगडसांगवी चे सरपंच प्रदीप पाटील फाजगे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे भाजपा गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, बोरगावचे सरपंच प्रतिनिधी पुंडलिक पाटील बोरगावकर, उपसभापती श्याम अण्णा पवार, दगडसांगवीचे सरपंच प्रदीप पाटील फाजगे, उपसरपंच सुधाकर गोरे,सतीश पाटील कराळे,माधवराव अंगकाडे, ग्रामपंचायत सदस्य कचरू फाजगे, पांडुरंग फाजगे, माधव ढवळे ,धारबा गोरे, तिरुपती बामणवाड, चेअरमन अशोक कल्लाळे, मनोहर फाजगे, सोपान फाजगे, संजय मोरताळे, अंबादास ढवळे, संदीप मोरतळे, शहाजी फाजगे, साईनाथ फाजगे, दिगंबर डिकळे, केशव तिडके, अण्णाराव पवार, सिद्धू पाटील वडजे, सरपंच लक्ष्मण केंद्रे, उपसरपंच अशोक गीते, चेअरमन नागेश हिलाल, फय्याज शेख , सरपंच दुलेखा पठाण, सरपंच संदीप पाटील पौळ , सचिन कदम, सचिन पवार,सरपंच तुकाराम कराळे, सह कार्यकर्ते, पदाधिकारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *