एकच मिशन – मराठा आरक्षण ची धग पोहचली गावागावात..

फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे )

गेली अनेक वर्षांपासून एकच मिशन , मराठा आरक्षण चा नारा देत आजपर्यंत अनेक मुकमोर्चे काढत आपल्या मागणीप्रति पाठपुरावा चालूच ठेवत अनेकांनी देह त्याग केला तरी पण अद्यापही सरकार काही केल्या ठाम निर्णय घ्यायला तयार नसल्याने गेले कांही दिवसांपासून जालना जिल्ह्यात मनोज पाटील जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली असून त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आता गावपातळीवर ही उपोषणाचे सत्र चालू झाले असून एकच मिशन , मराठा आरक्षण ची धग आता गावागावात पोहचल्याचे पहावयास मिळत आहे.

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत या मागणी साठी जालना येथे चालु असलेल्या उपोषणास जाहीर पाठिंबा देत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी मागील कांहीं दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील विविध गावात आमरण उपोषण चालु आहेत, सदरील उपोषण कर्त्यांची कुठलीही हाणी झाल्यास त्याला सर्वतः राज्य शासन जबाबदार राहील असा इशारा ही देण्यात आला आहे.

सकल मराठा समाज नांदेड च्या वतीने ठिकठिकाणी चालू असलेल्या उपोषणाची गाव व उपोषणकर्ते पुढील प्रमाणे..

उपोषण कर्ते
———————–
1) दत्ता पाटील हडसनिकर
स्थळ : हडसनी ता.हदगाव
उपोषणकर्ता शासकीय रुग्णालय नांदेड येथे ICU मध्ये दाखल
तब्बेत खालवलेली.

2) सतिश पाटील हिप्परगेकर.

3) गजानन पाटील हिप्परगेकर
स्थळ : तहसील कार्यालय, नायगाव.
दोन्ही उपोषणकर्त्यांची तब्बेत खालवलेली.

4) हनुमंत बालाजी ढगे
स्थळ: हनुमान मंदिर,वजीरगाव ता.नायगाव

5) संभाजी पाटील गोंधळे-वय ६५ वर्ष.

6) नामदेव पाटील डाकोरे -वय ३६ वर्ष
स्थळ:ग्राम पंचायत कार्यालय,पेठवडज ता.कंधार
उपोषण कर्त्यांच्या वयाचा विचार करून जाग्यावर सलाईन चालु, तब्बेत अतिशय नाजुक.

7) आकाश पाटील कल्याणकर
स्थळ: तहसील कार्यालय,कंधार

8) जयवंत कदम
9) स्वप्नील कदम
10) संतोष कदम
11) आकाश शिंदे
स्थळ :ग्रामपंचायत कार्यालय,धामदरी ता.अर्धापूर
उपोषण कर्त्यांची तब्बेत खालावलेली.

12) कुरुंदा गावातील सर्व समाज बांधव
स्थळ : स्मशानभूमी, कुरुंदा ता. वसमत

13) डेरला गावातील संपूर्ण गावकरी आपल्या कुटुंबासहित एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करीत आहेत.
स्थळ:जिल्हा परिषद शाळा, डेरला ता.लोहा

१४) पानशेवडी ता. कंधार येथील देवानंद आत्माराम मोरे हे ग्रामपंचायत कार्यालय पानशेवडी येथे ता. ९ सप्टेंबर पासून उपोषणास बसले आहेत.

आदी उपोषणकर्त्यांच्या जिवाला उपोषण काळात जर काही बरेवाईट झाले तर त्यास प्रशासन सर्वोतोपरी जबाबदार असेल असा उपोषणकर्त्याच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *