अंतरवाली आंदोलनास पाठिंबा देत पेठवडज येथील दोघांचं बेमुदत उपोषण

 पेठवडज ;( प्रतिनिधी  कैलास शेटवाड )

अंतरवाली येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या मागणीसाठी पेठवडज येथील ग्रामपंचायत सदस्य एकनाथ पाटील डावकोरे या तरुणाने आणि ज्येष्ठ नागरिक संभाजी पाटील गोंधळे या दोघांनी पेठवडज ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे. शासनाकडून उपाेषणाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत तालुक्यातील पेठवडज येथील सकल मराठा समाजातर्फे जेष्ठ नागरिक संभाजी गोंधळे ६२ वर्षे व ग्रामपंचायत सदस्य एकनाथ डावकोरे ३२ वर्षे हे दोघे जण गुरुवारपासून पेठवडज ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. यासोबतच गावातील सकल मराठा समाजातील नागरीक व महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. आज दोघांची प्रकृती खालावली असता सलाईन लावण्यास नकार दिला. कंधार पोलीस स्टेशनचे एपीआय आदित्य लोणीकर, पोलीस उपनिरीक्षक इंद्राळे, पोलीस कॉन्स्टेबल जुन्ने, बीट जमादार व्यवहारे यांनी मध्यस्थी करुन उपोषणकर्त्यांना विनंती केली असतां उपोषणकर्त्यांनी सलाईन लावून घेतली.

* विशेष ग्रामसभेचे तात्काळ आयोजन करणे….
पेठवडज गावाच्या वतीने जाहीर पाठिंबा म्हणून त्यांच्या समर्थनार्थ तात्काळ विशेष ग्रामसभेच्या आयोजन करून त्यात असा ठराव मांडावा की कुठल्याही अटी शर्ती न घालता महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बांधवांना सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण मिळेपर्यंत पेटवडज हे गाव इथून पुढे येणाऱ्या सर्व निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा लोकसभा निवडणुकीत सहभागी होणार नाही. निवडणुकीचा जाहीर बहिष्कार करत आहे. असे निवेदन सकल मराठा समाजातर्फे सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *