नांदेड ;मराठा मित्र मंडळ सिद्धनाथपुरी नांदेड यांच्या वतीने गणेश हारकरे यांनी आयोजित केलेल्या भव्य दहीहंडी स्पर्धेचे उद्घाटन डॉ.सचिन उमरेकर यांच्या हस्ते झाल्यानंतर चुरशीच्या लढतीत विजयी ठरलेल्या पंचशील दहीहंडी मंडळाला धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते रोख पारितोषिक देण्यात आले.
जुना नांदेड शहरातील चौफाळा भागात गेल्या २३ वर्षापासून दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश खोमणे, जिल्हा उपाध्यक्ष शितल खांडील, माजी नगरसेवक दिलीपसिंघ सोडी, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश जिंदम, सतीश बेरुळकर,नंदू गाजुलवार, राजू परे,शेख साजीद, लक्ष्मण येमलवार,राजू गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.दहीहंडी चे पूजन झाल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली.
पाच संघानी योग्य सलामी दिल्यामुळे त्यांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली.वेगवेगळ्या लोकप्रिय फिल्मी गीतावर शेकडो तरुण नाचत होते. ढोल ताशाच्या गजरात प्रत्येक संघ दहीहंडी फोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते.
हाती घोडा पालखी… जय कन्हैया लालकी… भारत माता की जय… जय श्रीराम या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता.बराच वेळ झाल्यानंतर ओम साई दही हंडी मंडळ , चौफाळा युवा दही हंडी मंडळ,संस्कुती दही हंडी मंडळ,पंचशील दहीहंडी मंडळ या संघाना दहीहंडी फोडण्यात यश न मिळाल्यामुळे इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तांबे यांच्या सूचनेनुसार दहीहंडी थोडी खाली घेण्यात आली.
त्यानंतर पंचशील दहीहंडी मंडळाने चार मानवी थर रचून दहीहंडी फोडताच जल्लोष करण्यात आला. विजयी संघाला डॉ. उमरेकर, पवन गुरुखुदे,शेख मुजाहीद, शिवाजी बांद्रे, जय मातादी पान शॉप, गणेश बत्तलवाड, प्रवीण कुरुडे, धनु पापनवार, सूर्यकांत नागनगिरी,तेजस फोटो स्टुडिओ, गोविंद ढवळे, रवी लखनौवाले, संकल्प मेडिकल ,सरस्वती किराणा, जैन मेडिकल, सुनील कस्तुरकर ,रमेश किराणा यांच्यातर्फे रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. विक्रम पाटील बामणीकर यांनी कार्यक्रमाचे संचलन तर आभार मारुती बांद्रे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पप्पू इंदुरकर, गंगाधर पांचाळ,शुभम मेथे, राजू हरकरे ,दीपक यादव ,मारोती बांद्रे, मुकेश कडेकर, प्रथमेश कडेकर , गणेश बत्तलवार ,राजू हरकरे, कृष्णा तिडके, शंकर भालेराव, शंकर हरकरे यांनी परिश्रम घेतले. दहीहंडी स्पर्धा पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दहीहंडीची परंपरा अनेक वर्षापासून सुरू ठेवल्याबद्दल सहज गणेश हरकरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.