नांदेड ; प्रतिनिधी
समाजसेवेचा एक अनोखा पायंडा पाडत समाजाच्या शेवटच्या घटकासाठी कार्य करणारे धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी पी . एस.बोरगावकर व प्रवीण साले यांच्या हस्ते धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांना ‘ अखंड सेवावृत्ती ऊर्जा गौरव ‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला असून ठाकूर यांच्या पुरस्काराची संख्या ८२ झाली असल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.*
नमस्कार चौक नांदेड येथील गणराज हॉटेलमध्ये
दैनिक वृत्त महानगर च्या द्विपृती वर्धापन दिनाच्या सोहळ्यात व्यासपिठावर भाजपचे संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस व्यंकट मोकले, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापूरकर, दिग्दर्शक डॉ. प्रमोद अंबाळकर, स्वागताध्यक्ष ॲड. विजय गोणारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक कुलदीप सूर्यवंशी यांनी केले.महाराष्ट्र रत्न, मराठवाडा भूषण, कर्मयोगी,दीनबंधू सेवा पुरस्कार,नांदेड के सांता, शान ए नांदेड,इन्स्पायर पर्सनालीटी,आदर्श शिवसैनिक पुरस्कार,राजपूत भूषण पुरस्कार,माँ जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार,राजे छत्रपती शिवाजी सेवाभाई पुरस्कार ,मातोश्री गंगूताई पुरस्कार,जीवन साधना पुरस्कार, भगत नामदेव लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड, अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार, कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय कृपा पुरस्कार, तिरंगा गौरव पुरस्कार,लॉयन्स बेस्ट प्रोजेक्ट इंटरनॅशनल अवार्ड,कृतज्ञता सेवेचा पुरस्कार ,राजरत्न पुरस्कार , संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता, देवदूत ही उपाधी यासारखे अनेक पुरस्कार देऊन देशभरातील विविध संस्थातर्फे गौरविण्यात आले आहे. कोरोना लॉकडाउनच्या काळातील केलेल्या कामाची दखल घेऊन २२ संस्थांनी कोरोना योद्धा हा पुरस्कार देऊन कौतुकाची थाप मारली आहे. विशेष म्हणजे यातील १६ संस्था मुंबई,पुणे तसेच महाराष्ट्र बाहेरच्या असल्याचे कुलदीप सूर्यवंशी यांनी सांगितले.त्यानंतर रणजित गोणारकर यांनी धीरगंभीर आवाजात मानपत्राचे वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह, मानपत्र, शाल,श्रीफळ,पुष्पहार देऊन दिलीप ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना प्रवीण साले यांनी असे सांगितले की,तेरा वर्षात ७ लाखापेक्षा जास्त जेवणाचे डबे गरजूंना वाटप करणारे ॲड.ठाकूर हे वर्षभरातून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ८३ उपक्रम ते नांदेडमध्ये घेतात. रस्त्यावर फिरणाऱ्या वेड्या लोकांना दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी एकत्र करून त्यांची दाढी कटिंग करण्यात येते. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ घालून नवीन कपडे व शंभर रुपये बक्षीस देण्याचा आगळावेगळा कायापालट हा उपक्रम गेल्या ३२ महिन्यापासून सुरू आहे.अन्न वाया जाऊ नये तसेच नांदेड शहरात कोणीही उपाशी राहू नये यासाठी भाऊचा माणुसकीचा फ्रिज ठेवण्यात आला आहे. गेल्या ११ महिन्यापासून एकही दिवस खंड न पडता दररोज किमान ४० ते १२० डबे या फ्रिजमध्ये ठेवण्यात येतात.चार वर्षापासून दरवर्षी हिवाळ्यात ४० मध्यरात्री फिरून रस्त्यात कुडकुडत झोपलेल्या बेघर नागरिकांना २००० पेक्षा जास्त ब्लॅंकेट चे वाटप त्यांच्या मार्फत करण्यात येत आहे. पावसाळ्यात कृपा छत्र या उपक्रमां अंतर्गत आतापर्यंत चार वर्षात आठ हजारापेक्षा जास्त छत्र्याचे वाटप करण्यात आले आहे. उन्हाळ्यात अनवाणी फिरणाऱ्या व्यक्तींसाठी चरण सेवा या उपक्रमा अंतर्गत चप्पला वाटप करण्यात येते त्यामुळे दिलीप ठाकूर यांचे कौतुक करावे तितके कमी आहे.सत्काराला उत्तर देताना दिलीप ठाकूर यांनी दररोज आपल्या हातून एक तरी सेवा कार्य घडावे असा ध्यास घेतला असून या पुरस्कारा मुळे आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे सांगून वृत्त महानगर टीमचे आभार मानले. कार्यक्रमाचे अतिशय व्यवस्थित सूत्रसंचलन सहसंपादक विजयकुमार वाघमारे यांनी तर आभार सुनील शिंदे यांनी मानले. दिलीप ठाकूर यांच्या कार्याची दखल घेऊन आता पर्यंत त्यांना ८२ पुरस्कार मिळाल्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
( छाया: धनंजय कुलकर्णी )