माझ्या वाचक मैत्रीणीचा मला मेसेज होता,,मॅम माझं लग्न होवुन ३ वर्षे झाली आणि आता मी डीवोर्स घेणार आहे कारण ३ वर्षात मी सुंदर दिसते हे तो एकदाही म्हणाला नाही.. मॅम मी खरच सुंदर आहे हो.. बाहेर माझा मित्र परिवार मला मॉडेल म्हणतो.. माझ्या सासूबाई बाहुली म्हणतात पण याच्या तोंडुन एकदाही हा शब्द येत नाही..
यावरुन माझ्या बाबतीत घडलेला २ दिवसापूर्वीचा किस्सा सांगते.. जन्माष्टमीच्या दिवशी मी साडी नेसुन मंदिरात निघाले होते.. आवरुन झाल्यावर सहज सचिनला लाडात म्हटलं ,कशी दिसते बायको ?.. त्याचं ऑफिसचं काम सुरु होतं त्याने लॅपटॉपमधुन जस्ट मान वर केली आणि फक्त छान म्हणाला.. तेव्हा त्याची नजर जेमतेम माझ्या गुडघ्यापर्यत गेली असेल त्याने माझ्याकडे पूर्ण पाहिलेही नाही.. किंचीत वाईट वाटलं पण त्याचक्षणी मी विचार केला , त्याने मला जे स्वातंत्र्य दिलय ते कोणीच दिलं नसतं.. निव्वळ त्याच्या मुळेच मी आज लैगिकतेवर लिहु ,बोलु शकते..माझ्या छोट्या कामाचही त्याला खुप कौतुक आहे.. मी सुंदर दिसते हे म्हणायला माझे मित्र आहेत की.. ते त्यांच्या बायकोला सुंदर म्हणत नसतील पण मला म्हणतील.. एक व्यक्ती कुठल्याही नात्यात असूदेत ती आपल्या सगळ्या गरजा भागवु शकत नाही.. म्हणुनच सखा , मित्र , प्रियकर ही नाती निर्माण झाली..
आता पुन्हा त्या बाहुलीकडे येते..मुळात काही पुरूष हे रुक्षच असतात.. वागण्यात , बोलण्यात , रोमान्सशी तर काहीच संबंध नाही.. बरेचजण हे फक्त शारीरिक संबंधापुरतेच असतात.. ( अशा लोकांकडुन इतर कुठली अपेक्षाही करु नये..useless ) काही जण हे मनापासून प्रेम करतात म्हणजेच त्या स्त्रीच्या आवडीनिवडी लक्षात घेउन त्यानुसार स्वतःला मोल्ड करतात असे पुरूष स्त्रीला जास्त आवडतात.. काही जणाना वाटते पैसे दिले की काम झालं.. काही जण प्रेमाचा आव आणतात.. काहीजण बाहेर करुन येत असलेले उद्योग निस्तरायला घरी बायकोशी प्रेमाचं नाटक करतात .. काहीजण फक्त तुच गं माझी एकुलती एक पण प्रत्यक्षात वेगळच असतं.. आपल्या कर्मानुसार आपल्या आयुष्यात अशा व्यक्ती येतात मग त्यासाठी घटस्फोट कशाला घ्यायचा.. त्यापेक्षा ही एक गोष्ट सोडुन अजुन काय चांगले गुण आहेत याचा अभ्यास केला तर सकारात्मक किवा आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी जास्त दिसतील आणि मग आपण शांत होतो.. आपल्या माणसाला सोडुन देण्यापेक्षा तो देतोय ते घ्या आणि इतर गोष्टीसाठी बाहेर अनेक लोक आहेत.. ( कटु आहे पण सत्य आहे) .. काही वेळेला स्वतःच्या भावनांना आवरही घालता यायला हवा . कधी कधी काही गोष्टी सोडुनही देता यायला हव्यात.. विश्वसुंदरी असली तरीही तोच तोचपणा आला की आयुष्य बोअर होतं.. बदल हा नैसर्गिक आहे तो जो स्विकारुन आपले आणि दुसऱ्याचे कुटुंब जपुन पुढे जाईल तोच या जगात सुखी राहील..
माझ्या पुरूष मित्रांना एकच सांगेन , खुप छोट्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करायला तुम्हाला थोडं बदलायला लागलं तर काय हरकत आहे.. आणि स्त्रीयानाही सांगेन की प्रत्येक दगड हा देव होवु शकत नाही त्या दगडातच सौंदर्य शोधा आणि जीवनाचा आस्वाद घ्या.. आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी झाल्या तर संघर्षाची मज्जाच निघुन जाईल..
घटस्फोट , बलात्कार , आत्महत्या भ्याड लोक करतात .. आपल्याला त्या कॅटेगरीत न जाता दगडाला आकार देणारा मूर्तीकार होण्याचा प्रयत्न करायला काय हरकत असावी ना..
पहा विचार करुन.. सोच बदलो.. देश बदलेगा
- सोनल गोडबोले.. लेखिका