पेठवडज ; ( प्रतिनिधी,
कैलास शेटवाड )
अंतरवाली येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पेठवडज येथील ग्रामपंचायत सदस्य श्री.एकनाथ पाटील डावकोरे या तरुणाने आणि ज्येष्ठ नागरिक श्री. संभाजी पाटील गोंधळे या दोघांनी पेठवडज ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले असता उपोषणाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच दिनांक 10.09. 2023 रोजी पेठवडज येथील उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना व या गावातील सर्व मराठा बांधवांना व नागरिकांना पाठिंबा म्हणून मौजे सिरसी(खुर्द.) येथील गावातील समाज बांधवांनी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.