पेठवडज येथून मुस्लिम बांधव बरेली येथील अल्लाह हजरत उरुसाठी रवाना

 

 

पेठवडज प्रतिनिधी,
( कैलास शेटवाड. )

मौजे पेठवडज येथून मुस्लिम समाज बांधव बरेली येथील अल्लाह हजरत उरुसाठी येथे रवाना होताना हिंदू समाजबांधवा तर्फे मा.श्री.चंद्रकांत रावजी देशमुख साहेब (ग्रामसेवक) व मा.श्री.खुशालरावजी आनंदरावजी राजे ग्रा.का.पेठवडज (उपसरपंच प्रतिनिधी) यांच्यावतीने मुस्लिम समाज बांधवांना स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.

पेठवडज येथील मुस्लिम समाज बांधव पेठवडज येथून बरेली येथील अल्लाह आदर तेथे उरुसाठी आज दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ठीक आठ वाजता रवाना झाले असून बरेली येथे रवाना होत असताना हिंदू समाज बांधवा तर्फे माननीय श्री चंद्रकांत रावजी देशमुख साहेब ग्रामसेवक व तसेच माननीय श्री तुषार रावजी आनंदरावजी राजे तसेच सर्व हिंदू समाज बांधव व तसेच यावेळी मा.श्री.विजय राजे श्री.मनोज इंगोले व हैदर पिंजारी व दत्ता किनवाड,निरंजन रामतीर्थै शौकत शेख.मतीन शेख,अब्दुल तसेच चंद्रकांत देशमुख यांचे सर्व कार्यकर्ते व तसेच माननीय.श्री. खुशालरावजी राजे मित्र मंडळ यांचे कार्यकर्ते यांनी सर्व मुस्लिम समाज बांधवांचे स्वागत सर्वांना शुभेच्छा दिल्या .

यावेळी कैलास शेटवाड माजी सरपंच पेठवडज व तसेच बरेली ‌अल्ला हजरत येथे जात असताना पेठवडज येथे कुणबी मराठा आरक्षणा अनुषंगाने या ठिकाणी उपोषणास बसलेल्या दोन्हीही उपोषणकर्त्याचे सदिच्छा भेट घेऊन बरेले येथे अल्ला हजरत उर्स साठी रवाना झाले तसेच यावेळी सर्व हिंदू समाज बांधवाकडून त्यांना जात असताना शुभेच्छा देण्यात आल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *