(नांदेड ; प्रतिनिधी )
महाराष्ट्रातील सर्व शासकीय विद्यानिकेतन ला भेटी देण्यासाठी काढण्यात आलेली वाहन यात्रा नांदेड येथे आली असता पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे व धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर सचखंड गुरुद्वारा येथे सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
पाचही विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन सर्व विद्यानिकेतनच्या विकासास हातभार लावतील या उद्देशाने ३ ते ५ नोव्हेंबर २०२३ महासैनिक दरबार हॉल कोल्हापूर येथे महामेळावाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महामेळाव्यासाठी वातावरण निर्मिती व्हावी यासाठी काही माजी विद्यार्थी महाराष्ट्रभर फिरत आहेत. अत्यंत संस्कारक्षम असलेल्या शासकीय विद्यानिकेतन चे अनेक माजी विद्यार्थी उच्च स्तरावर कार्यरत असून समाजातील वेगवेगळ्या घटकात उल्लेखनीय कार्य करत आहेत.
या सर्वांचे पहिल्यांदाच एकत्रीकरण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नांदेड येथे राजेंद्र माळी मुंबई, अतुल मंडपे कोल्हापूर, गजानन गोणी पुसेगांव, प्रितम फणसवाडीकर पुसेगांव, राजेंद्र मुधाळे बहिरशेट , दशरथ गोडसे सातारा, बंडोपंत पाटील सातारा , बाळसाहेब हारके सातारा, विवेकांनद पाटील सातारा, प्रमोद बावयकर सांगली , संजय डोंगळे, वसंतराव बगल, शामराव घोरपडे पुसेगाव हे आले होते.
नांदेड येथे कार्यरत असणारे खंडेराव धरणे,ॲड.दिलीप ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप लोखंडे, बँकेचे अधिकारी विनायक पाटील, उपजिल्हाधिकारी विकास माने यांच्या भेटी घेऊन त्यांना महामेळाव्याचे निमंत्रण दिले.
नांदेड येथील प्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा येथे जाऊन सर्वांनी दर्शन घेतले. यावेळी सर्वांचा पवित्र रुमाली व सिरोपाव देऊन सत्कार करण्यात आला.कोल्हापूर महामेळावासाठी नांदेड जिल्ह्यातील पब्लिक स्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन असे दिलीप ठाकूर व प्रदीप लोखंडे यांनी केले आहे.