दादा कोंडके फाउंडेशन..
ज्येष्ठ अभिनेते ( विनोदाचा बादशहा )मा.दादा कोंडके यांचे निस्सीम चाहते ,भक्त , मित्र त्यांच्यासमवेत अनेक काळ घालवलेले आणि त्यांना जाऊन २५ वर्षे झाली तरीही स्वतःच्या हृदयात , मनात त्यांची रोज पुजा करणारे आणि या फाउंडेशनचे विश्वस्त मा. श्री.. मनोहर कोलते सर यांची ओळख मा.डॉक्टर राजेंद्रजी भवाळकर सर यांच्यामुळे जवळपास ७ वर्षापूर्वी झाली .. एकदम साधं व्यक्तीमत्व पण तितकच महान.. रोज सकाळी सुंदर सुविचार पाठवुन ते दिवसाची सुरुवात करतात आणि माझ्यासारख्या लेखिकेला विचार करायला लावतात..
भवाळकर सर यांची ओळख मी केलेल्या नटसम्राट नाटकाच्या विक्रमापासुनची आहे त्या दिवसापासून त्यांनी त्यांच्या विनोदबुध्दीने मला प्रेरीत केलं आणि आमचे फॅमिली फ्रेंड झाले.. झेंडा स्वाभिमानाचा या सिनेमातील माझी मुख्य भूमिका पाहुन त्यांनी मनोहर सरांकडे मला पुरस्कार द्यावा अशी शिफारस केली आणि त्याचदिवशी मनोहर सर आयडॉल म्हणुन माझ्या आयुष्यात आले.. दादा कोंडके फाउंडेशनच्या नावाने दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यावर्षी डॉक्टर निलेश साबळे यांना दिला त्यानिमित्ताने त्यांनी आवर्जून मला कार्यक्रमाला बोलावलं होतं. चार वर्षापूर्वी त्यांनी मला हा बहुमान दिला असूनही गेली अनेक वर्षे ते आवर्जून माझे नाव घेउन स्टेजवर बोलावतात आणि कौतुकाने माझा सन्मान करतात..
शनिवारी हा कार्यक्रम साहित्य परीषद , टिळक रोड पुणे येथे हा कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला.. माझे अनेक मित्र ,वाचक , चाहते होते.. ज्यांना ज्युनीअर दादा म्हणतात ते म्हणजे शंकर जाधव होते.. सुत्रसंचालन नेहमीप्रमाणे उत्तम करणारे संतोष चोरडीया असतील किवा महावितरणाचे राजेंद्रजी पवार असतील अशा अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते हा सन्मान देण्यात आला आणि मनोहर सरांचे मनोहारी विचार या सुंदर सुविचार असलेल्या पुस्तकाने माझ्या लायब्ररीत अजुन ज्ञानाची भर पाडली..
सर मी तुम्हा सगळ्यापेक्षा खूपच लहान आहे पण तरीही प्रत्येकवेळी तुम्ही मला सन्मान देउन मोठे केलय..
तुम्हा दोघांची मी आजन्म ऋणी राहीन..
अशाच कार्यक्रमाना आवर्जून बोलवत रहा.. मला यायला नक्की आवडेल..
सोनल गोडबोले… लेखिका